शिवसेना मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी होणार, सेनेचे दोन नेते उद्या शपथ घेणार!
एबीपी माझा वेब टीम | 07 Jul 2016 02:34 AM (IST)
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळानंतर आता उद्या 8 जुलैला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या बहुप्रतिक्षीत विस्तारामध्ये कुणाला संधी मिळते आणि कुणाची जबाबदारी कमी होते, हे पाहणं महत्वाचं आहे. नव्या विस्तारात एकूण 9 मंत्री शपथ घेतील. यामध्ये 4 जण भाजपचे, 3 जण मित्रपक्षांचे तर शिवसेनेच्या दोन जणांचा समावेश असेल. या मंत्रिमंडळ विस्तारात पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. तर मुंबईच्या वाट्यातील एक मंत्रिपद महापालिका निवडणुकीनंतर भरण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार 8 जुलै *9 मंत्री शपथ घेणार *4 मंत्री भाजपचे *3 मंत्री मित्रपक्षाचे *2 मंत्री शिवसेनेचे *मित्रपक्षांमध्ये सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विनायक मेटे *शिवसेना - गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर भाजप वाटणी *भाजपकडून मंत्रिपदासाठी पश्चिम महाराष्ट्र, सांगलीला प्राधान्य मिळण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक ही नावे आघाडीवर आहेत. *मराठवाड्यातून सुधाकर भालेराव, संभाजी पाटील निलंगेकर यांची नावे चर्चेत आहेत. *पश्चिम विदर्भातून पांडुरंग फुंडकर, डॉ संजय कुटे, मदन येरावर नावे आघाडीवर आहेत. *उत्तर महाराष्ट्र जयकुमार रावल, हरिभाऊ जावळे, या नावांची चर्चा आहे.