राज्यातील एसटी बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करावी तसेच शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा आणि ऑटोच्या माध्यमातून होणाऱ्या वाहतुकीला परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सुमारे एक तास डफ आणि बँड वाजवून लोकांच्या रास्त मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. राज्य सरकारने खाजगी वाहतूकदारांना वाहतुकीची परवानगी दिली असून ते सामान्य जनतेची लूट करतायेत असा आरोपही आंबेडकर यांनी केला.
पार्थ पवार इमॅच्युअर, त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार
सरकारने एसटी सेवेला परवानगी दिली असती तर ही लूट झाली नसती, असे आंबेडकर म्हणाले. दरम्यान, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी वाहतूकीला अडथडा तर निर्माण केलाच, सोबतच सोशल डिस्टनन्सिंग नियमांची ही ऐशीतैशी केली. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने कार्यकर्ते मास्क न घालताच आंदोनलात सहभागी झाले होते. त्यामुळे एका बाजूला सामान्य नागरिकांच्या हितासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून आले.
जालना
जालना मध्यवर्ती बसस्थानात वंचित बहुजन आघाडीकडून डफली बजाव आंदोलन करण्यात आलं. कोरोनाच्या काळापासून बससेवा पूर्णपणे बंद आहेत. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर काही तुरळक बसेस सोडण्यात आल्यात. मात्र, त्याचे भाडे सर्व सामान्य गोरगरिबांना परवाडणारे नाहीय. त्यामुळं गोरगरिबांसाठी बससेवा पुन्हा सुरु करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी होती. त्यानुसार जालन्याच्या बसस्थानक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डफली वाजवून सरकारचा निषेध व्यक्त केलाय.
पुणे
पुण्यातही वंचित बहुजन आघाडीच्यातीनं महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या विभागीय डेपोत डफली बजाव आंदोलन करण्यात आलं. राज्यात परिवहन बससेवा लवकरात लवकर सुरु करावी. सोबतचं पुणे शहराची लाईफलाईन असलेली पीएमपीएमएलची बससेवा सुरु करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. जर राज्य सरकारने लवकरात लवकर परिवहन सेवा सुरु केल्या नाहीत तर आणखी तीव्र पद्धतीनं आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांच्यावतीनं सरकारला देण्यात आलाय.
नांदेड
नांदेडच्या विभागीय एसटी कार्यालयासमोर आज वंचित बहुजन आघाडीतर्फे दुपारी आंदोलन करण्यात आलं. कार्यालयासमोर ढोल ताशे आणि डफली वाजवून हे आंदोलन करण्यात आलं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु करावी या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं होत. सध्या जिल्हा अंतर्गतच नियंत्रित बस वाहतूक सुरु आहे. पण आगामी आगामी काळात लांब आणि मध्यम पल्ल्याच्या सर्व एसटी बसेस सुरु करा, ही मागणी या आंदोलनकर्त्यांची होती.
अमरावती
अमरावतीत विभागीय बसस्थानकासमोर वंचित आघाडीने डफली बजाव आंदोलन करत सरकार विरोधात आवाज बुलंद केला. लॉकडाऊन बंद करा अन्यथा आम्ही लॉकडाऊन तोडू या भूमिकेवर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर ठाम आहे, कारण कोरोनामुळे रोजगार बुडाला आता पुन्हा लॉकडाऊन नको, तर एसटी बस सेवाही बंद करण्यात आली. बससेवा पुन्हा पूर्वरत करण्यात यावी तसेच सर्व दुकाने उघडी ठेवावी, असे आवाहन वंचितने आज अमरावतीत केलं.
अकोला
केंद्र आणि राज्य सरकारच्या लॉकडाउनविरोधात आज वंचित बहूजन आघाडीनं 'डफली बजाव' आंदोलन केलंय. प्रकाश आंबेडकरांचा राजकीय गड असलेल्या अकोल्यातही आज मोठ्या प्रमाणात हे आंदोलन झालंय. राज्यातील नागरी वाहतूक सुरू करण्याची मागणी वंचित बहूजन आघाडी या आंदोलनातून केलीय. राज्यातील एसटी सेवा आणि महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू करण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी सरकारकडे केलीय. अकोल्यात मध्यवर्ती बसस्थानक, जुने बसस्थानक, एसटी विभागीय कार्यालय, महापालिका आणि शहर बस वाहतूक कार्यालयात हे आंदोलन करण्यात आलंय.
हिंगोली
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज हिंगोली शहरामध्ये डफली बजाओ आंदोलन पार पडले. लागू करण्यात आलेली संचारबंदी तात्काळ उठवावी, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांची थकलेले पगार तात्काळ मिळावे, बंद असलेली छोटे-मोठे व्यापार सुरू झाले पाहिजे. अशीही मागणी आंदोलकांनी केली आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. हिंगोली शहरातील बस स्थानक परिसरातील मुख्य रोडवर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष वशिम देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले.
परभणी
राज्यातील एसटी आणि सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या पुकारण्यात आलेले राज्यव्यापी डफली आंदोलन आज परभणीतही करण्यात आले. मात्र, काही क्षण आंदोलन केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. शहरातील बस स्थानकासमोर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते डफली घेऊन जमले होते. घोषणाबाजी सुरु करून डफली वाजवताच पोलिसांनी हे आंदोलन थांबवुन सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्याकडे रवाना केले.
नागपुरात प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहूजन आघाडीकडून डफली बजाओ आंदोलन