Anil Parab on ST Workers Strike : एसटीचा संप अद्याप देखील सुरूच आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाई केली जाणार असल्याचा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला आहे. पण, कर्मचारी मात्र विलिनिकरणाच्या मागणीवर ठाम आहे. यावर विचारले असता परिवहन मंत्री अनिल परब यांनी 'सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही. मेस्मा लावण्याबाबत उद्याच्या बैठकीनंतर निर्णय होऊ शकतो. तसेच, याबाबत वेगवेगळ्या पर्यायांवर विचार सुरू असून आमचं दायित्व जसं कर्मचाऱ्यांशी तसं ते जनतेशी देखील असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे. रत्नागिरी येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत देखील प्रश्न विचारला गेला. त्यावर बोलताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचं म्हणत अप्रत्यक्षरित्या सदावर्ते यांना लक्ष्य केलं. सध्या मी रत्नागिरी येथे दौऱ्यावर आहे. त्यामुळे पुढील होणाऱ्या कारवाईबाबत मुंबईला गेल्यानंतर उद्या अर्थात शुक्रवारी निर्णय घेतला जाणार असल्याचं यावेळी परब यांनी म्हटलं आहे.
बदनामी करणं हे सोमय्यांचा धंदा
यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर देखील आक्रमकपणे उत्तर दिलं. 'मी किरीट सोमय्यांना उत्तर देण्यास बाधिल नसून संबंधित यंत्रणांना ते दिलं आहे. सोमय्यांनी मुख्यमंत्री, महाविकास आघाडी आणि माझी बदनामी करण्याचा धंदा सुरू केला आहे याबाबत मी कोर्टात दावा दाखल केला आहे. त्यांमुळे किरिट सोमय्यांना माझी माफी तरी मागावी लागेल किंवा 100 कोटी तरी द्यावे लागतील' असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
ओबीसी प्रश्नावर काय म्हणाले परब?
दरम्यान, सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसून कॅबिनेटमध्ये निवडणुका पुढे ढकलण्याबाबत निर्णय झाल्याची प्रतिक्रिया देखील परब यांनी दिली. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- विमान प्रवास स्वस्त होणार?IOC कडून ATF च्या दरात कपात
- करण जोहरच्या पार्टीत राज्य सरकारमधील मंत्री?, आशिष शेलारांचा गंभीर आरोप
- Bail Gada Sharyat : बैलगाडा शर्यतीवरील बंदी आणि सात वर्षांचा लढा!- वाचा आतापर्यंत काय काय घडलं...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha