ST Workers Strike Live Updates : एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण? अज्ञातांकडून 2 शिवशाही बसवर दगडफेक  

Maharashtra ST Employee Protest : एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे.

abp majha web team Last Updated: 11 Nov 2021 06:14 PM
एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण? अज्ञातांकडून 2 शिवशाही बसवर दगडफेक  

महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा अनेक कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. यातच एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण मिळाल्याचं दिसू लागलंय. नाशिकच्या महामार्ग बसस्थानकातील 2 शिवशाही बसवर दगडफेक करण्यात आलीय. एका बसची मागील काच फोडली तर दुसऱ्या बसचे लाईट फोडण्यात आली. दोन दुचाकींवर आलेल्या काही अज्ञातांनी  दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दगडफेक केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झालेत. काही वेळापूर्वीच ही घटना घडल्याचं वृत्त आहे. 

कामावर येऊ इच्छिणाऱ्या कर्माचाऱ्यांना संरक्षण दिलं जाईल: अनिल परब 

आंदोलनात वेळ घालवू नका, कामावर परता, परिवहन मंत्री अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे. काही कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे पण भाजपचे कार्यकर्ते त्यांना कामावर येत नाहीत असा आरोप त्यांनी केला. कामावर येऊ इच्छिणाऱ्या कर्माचाऱ्यांना संरक्षण दिलं जाईल असंही ते म्हणाले. 

अनिल परब यांच्या घराबाहेर आंदोलन, आंदोलनकर्त्या महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

परिवाहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचं आंदोलन; आंदोलक महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात 

सांगलीत संपकरी एसटी कर्मचाऱ्याचे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सांगली-:

सांगलीत संपकरी एसटी कर्मचाऱ्याचे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन..

दोन दिवसांपूर्वी सांगली बस स्थानकासमोर सुरु असलेल्या एस टी कर्मचाऱ्याच्या आंदोलनात झाले होते सहभागी .आज सकाळी हृदयविकाराने झाले निधन..

राजेंद्र निवृत्ती पाटील वय 46 रा. कवलापूर असे त्यांचे नाव

जिल्हा स्तरावर संबंधित कामगार न्यायालयात संपकरी कर्मचार्‍यांच्या विरोधात दावे दाखल करण्याचे एसटी प्रशासनाचे निर्देश

जिल्हा स्तरावर संबंधित कामगार न्यायालयात संपकरी कर्मचार्‍यांच्या विरोधात दावे दाखल करण्याचे एसटी प्रशासनाचे निर्देश.

- संबंधित कामगार न्यायालयाने संप अवैध ठरविल्यास, संपकरी कर्मचार्‍यांच्या वर एसटी प्रशासनाकडून आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो.

- काम नाही..तर वेतन नाही! या नियमानुसार कर्मचाऱ्यांचे एका दिवसाला आठ दिवसाचे वेतन कपात केले जाऊ शकते.

आंदोलनात भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत- बावनकुळे

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात गणेश पेठ बसस्थानकावर जाऊन आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली... भाजप या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे असे बावनकुळे यांनी त्याठिकाणी जाहीर केले... अनेक कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर ही सरकार असंवेदनशीलपणे वागत आहे.. त्यामुळे हे आंदोलन कुठल्याही वळणावर जाऊ शकतो अशी भीती व्यक्त करत  आत्महत्या कुठल्याही समस्येला पर्याय नाही... त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये असे आवाहनही बावनकुळे यांनी कर्मचाऱ्यांना केले...

राज ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार कायदेशीर लढ्याची दिशा ठरणार,एस टी कर्मचाऱ्यांसोबत मनसेचा लढा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विधी व न्यायविभाग टीमही कृष्णकुंज वर दाखल

राज ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार कायदेशीर लढ्याची दिशा ठरणार

एस टी कर्मचाऱ्यांसोबत मनसेचा लढा

गरज लागली तर कायदेशीर लढ्यालाही मनसे तयार

विश्रांतीगृहातून बाहेर काढल्यामुळे आता संपकरी फूटपाथवर राहून संपात सहभागी

राज्यातील 250 बस डेपो बंद झालेत याचा आज चौथा दिवस आहे. परंतु अजूनही संप मिटत नसल्यामूळे एसटी महामंडळाने आता कर्मचाऱ्यांची कुचंबणा करण्यासाठी त्यांना डेपो मध्ये देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा बंद केल्या आहेत. रात्रीत विश्रांतीगृहातून बाहेर काढल्यामुळे आता संपकरी फूटपाथवर राहून संपात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत विलीनीकरणाची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

ST Strike Mumbai : मुंबईत विद्याविहार येथील एसटी कार्यशाळेचे कर्मचारी सुध्दा आंदोलनात सहभागी

एकूण 918 कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत महामंडळाकडून कारवाई

संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात महामंडळ आक्रमक झालं आहे. मुख्यमंत्र्यांसह परिवहन मंत्र्यांनी एसटी कामगारांना कामावर येण्याचं आवाहन केलंय. तर दुसरीकडे कारवाई सुरू ठेवलीये परवा 376 आणि काल 542 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.  एकूण 918 कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत महामंडळाकडून कारवाई करण्यात आली आहे.  कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठ्या कारवाईचे संकेत मंत्र्यांनी दिले आहेत. कामावर हजर राहावे असे आवाहन संघटनांनी करावे. असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आवाहन केलं आहे. तर महामंडळाच्या विलीनीकरण प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आझाद मैदानावरचे आंदोलन सुरू ठेवण्याचं भाजपनं म्हटलं. त्यामुळे आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी येण्याची शक्यता आहे.

आज एस.टी.कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार

दुसरीकडे आज एस.टी.कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. मनसेनं यापूर्वीच एसटी कामगारांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.   एसटी महामंडळाकडून विभागीय नियंत्रकांना कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे थेट आदेश देण्यात आले आहेत.  एसटीच्या विभागातल्या कोर्टाच्या अधिकारक्षेत्रात असणाऱ्या कामगार न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.  एसटी महामंडळाकडून जिल्ह्यातल्या कामगार न्यायालयात आज रिट याचिका दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईसोबतच आर्थिक भुर्दंडही सोसावा लागू शकतो.  आंदोलनाच्या दिवसापासून आतापर्यंत एसटी महामंडळाचे 100 कोटींचे नुकसान झाले आहे.  

राज्य सरकार सोबत बुधवारी बैठक अयशस्वी झाल्यानंतर आज पुन्हा एकदा शिष्टमंडळ परिवहन मंत्र्यांची भेट घेणार

राज्य सरकार सोबत बुधवारी बैठक अयशस्वी झाल्या नंतर आज पुन्हा एकदा शिष्टमंडळ परिवहन मंत्र्यांची भेट घेणार

- सदाभाऊ खोत आणि एसटी महामंडळातील कर्मचारी परिवहन मंत्र्यांची भेट घेणार

- विलीनीकरणाची मागणी पूर्ण होईपर्यत कर्मचारी आंदोलनावर ठाम

- परिवहन मंत्र्यांच्या आजच्या बैठकीत मार्ग निघण्याची संपकऱ्यांना आशा

पार्श्वभूमी

ST Workers Strike :  जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे.  एसटी कामगारांना शासकीय सेवेत घ्यावं अशी मागणी करत काल मंत्रालयावर मोर्चासाठी निघालेल्या भाजप नेत्यांसह काही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि नंतर आझाद मैदानात आणलं होतं. जोवर मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर कर्मचारी मुंबई सोडणार नसल्याचं भाजप नेत्यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे कामावर रूजू न होणाऱ्यांविरोधात मोठ्या कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. 

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कळकळीचं आवाहन

संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात महामंडळ आक्रमक झालं आहे. मुख्यमंत्र्यांसह परिवहन मंत्र्यांनी एसटी कामगारांना कामावर येण्याचं आवाहन केलंय. तर दुसरीकडे कारवाई सुरू ठेवलीये परवा 376 आणि काल 542 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.  एकूण 918 कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत महामंडळाकडून कारवाई करण्यात आली आहे.  कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठ्या कारवाईचे संकेत मंत्र्यांनी दिले आहेत. कामावर हजर राहावे असे आवाहन संघटनांनी करावे. असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आवाहन केलं आहे. तर महामंडळाच्या विलीनीकरण प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आझाद मैदानावरचे आंदोलन सुरू ठेवण्याचं भाजपनं म्हटलं. त्यामुळे आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे आज एस.टी.कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. मनसेनं यापूर्वीच एसटी कामगारांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.   एसटी महामंडळाकडून विभागीय नियंत्रकांना कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे थेट आदेश देण्यात आले आहेत.  एसटीच्या विभागातल्या कोर्टाच्या अधिकारक्षेत्रात असणाऱ्या कामगार न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.  एसटी महामंडळाकडून जिल्ह्यातल्या कामगार न्यायालयात आज रिट याचिका दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईसोबतच आर्थिक भुर्दंडही सोसावा लागू शकतो.  आंदोलनाच्या दिवसापासून आतापर्यंत एसटी महामंडळाचे 100 कोटींचे नुकसान झाले आहे.  

ST Workers Strike: संप सुरू राहिल्यास कामगारांची अडचण वाढेल, भडकवणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका : अनिल परब 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.