ST Workers Strike Live Updates : लालपरी ठप्प! ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन, वाचा प्रत्येक अपडेट

Maharashtra ST Employee Protest : एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे. आपल्या मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झालेत

abp majha web team Last Updated: 10 Nov 2021 11:15 AM
संयुक्त कृती समिती आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक

एसटी संपासंदर्भात एस टी कर्मचारी संयुक्त कृती समिती आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक सायंकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथिगृहावर कॅबिनेट बैठकीनंतर होणार

राज्यमंत्री बच्चू कडू यांचा एसटी संपाला पाठिंबा, मात्र महामंडळ विलीन करण्याची मागणी अवास्तव

राज्यमंत्री बच्चू कडू यांचा एसटी संपाला पाठिंबा 


मात्र महामंडळ विलीन करण्याची मागणी अवास्तव


राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ एसटी कामगारांनाही मिळावेत


पण महामंडळ एक विलीन केलं तर बाकीच्या बाबत सुद्धा अशाच मागण्या सुरू होतील


प्रहार संघटनेच्या माध्यमातून लवकरच अनाथ विधवा, दीनदुबळे यांच्यासाठी संवाद यात्रा


पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावापासून ही संवाद यात्रा सुरू करणार


तीनशे किलोमीटरच्या या संवाद यात्रेतून मिळणारा फीडबॅक सरकारपर्यंत पोहोचवणार

किरिट सोमय्या आणि पडळकरांना आकाशवाणी आमदार निवासस्थानाच्या बाहेरून पोलिसांनी ताब्यात घेतलं

किरिट सोमय्या आणि पडळकरांना आकाशवाणी आमदार निवासस्थानाच्या बाहेरून पोलिसांनी ताब्यात घेतलं

कोल्हापूर एस टी आगारात एका कर्मचाऱ्याने फास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

कोल्हापूर एस टी आगारात एका कर्मचाऱ्याने फास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला


इतर कर्मचाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांला तात्काळ रोखलं.


सदानंद सखाराम कांबळे या कर्मचाऱ्याने रुमाल गळ्याला बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला


सदानंद कांबळे हा गगनबावडा आगाराचा कर्मचारी..

सर्व आंदोलक आझाद मैदानात तासाभरात पोहचतील

 


सर्व आंदोलक आझाद मैदानात तासाभरात पोहचतील . किरीट सोमय्या आणि गोपीचंद पडळकर मंत्रालयात निघत आहेत


 

विलिनीकरण करण्याची मागणी एक दोन दिवसात पूर्ण होणारी नाही. आपण कामावर या, चर्चेतून मार्ग काढू- अनिल परब

उच्च न्यायालयाच्या आदेशाचं आम्ही पालन केलंय. एसटी कर्मचाऱ्यांनीही पालन करावं. लोकांना वेठीस धरु नये. कुणी भडकवत असेल तर त्यांना बळी पडू नका. मागण्या चर्चा करुन पूर्ण करु असं आश्वासन दिलं होतं. हा संप बेकायदेशीर आहे. पुन्हा विनंती आहे की, आपण कामावर यावं. कामगारांच्या नुकसानीला जबाबदार हे भाजप नेते असतील. विलिनीकरण करण्याची मागणी एक दोन दिवसात पूर्ण होणारी नाही, त्रिसदस्यीय समिती आपला अहवाल 12 आठवड्यात देणार आहे. आपण कामावर या, चर्चेतून मार्ग काढू- अनिल परब

सांगली बस स्थानकात वडाप लावून प्रवाशी वाहतुक सुरु, एस टी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने प्रशासनाचा निर्णय


सांगली बस स्थानकात वडाप लावून प्रवाशी वाहतुक सुरु, एस टी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने प्रशासनाचा निर्णय

सांगली-: सांगली बस स्थानकात वडाप लावून प्रवाशी वाहतुक सुरु, एस टी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने एस टी प्रशासनाने घेतला निर्णय


वडाप गाड्या लावून प्रवासी वाहतूक सुरु

ST Workers Morcha : मुंबईत मोर्चासाठी निघालेल्या सदाभाऊ खोत यांना मानखुर्द इथं पोलिसांनी रोखलं

ST Workers Strike :शांततेत सुरु असलेल्या आंदोलनात अनिल परब यांना उद्रेक घडवायचाय: Gopichand Padalkar

भाजपचे सर्व आमदार काही वेळात वाशी चेक नाक्यावर पोहोचणार

भाजपचे सर्व आमदार काही वेळात वाशी चेक नाका येथे पोहोचत आहेत. मंगलप्रभात लोढा, किरीट सोमय्या, राम कदम, पराग शहा, राहुल नार्वेकर पोहोचत आहेत

एस.टी. महामंडळकडून संपकऱ्यांविरोधात अवमान याचिका सादर

शुक्रवारपर्यंत कामगार संघटनांना अवमान याचिकेवर उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश

कोर्टाचा अवमान करणा-यांना नोटीस जारी करण्याची महामंडळाकडून हायकोर्टाला विनंती, संप न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश असूनही कामगार  संपावर ठाम,  शुक्रवारपर्यंत कामगार संघटनांना अवमान याचिकेवर उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश, पुढील सोमवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी

एसटी प्रशासनाची संपाच्या विरोधात कारवाईला सुरुवात, ठाण्यातील खोपट डेपोमधील कर्मचाऱ्यांचे विश्रांतीगृह केले बंद

एसटी प्रशासनाची संपाच्या विरोधात कारवाईला सुरुवात, ठाण्यातील खोपट डेपो मधील कर्मचाऱ्यांचे विश्रांतीगृह केले बंद, सर्व कर्मचाऱ्यांना आपले कपडे आणि बॅगा घेऊन काढले बाहेर, खोपट डेपो मॅनेजर यांनी दोन्ही विश्रांतीगृह ठोकले टाळे, आता खऱ्या अर्थाने सर्व एसटी कर्मचारी आले रस्त्यावर 

एस.टी. संपाविरोधातील याचिकेला सुरूवात, एस.टी. महामंडळानं संपकऱ्यांविरोधात अवमान याचिका सादर केली

एस.टी. संपाविरोधातील याचिकेला सुरूवात, एस.टी. महामंडळानं संपकऱ्यांविरोधात अवमान याचिका सादर केली

आम्हाला मुंबईत सर्व कर्मचाऱ्यांसोबत जाऊ द्या अन्यथा आम्ही इथून उठणार नाही- प्रवीण दरेकर

आम्हांला मुंबईत सर्व कर्मचाऱ्यांसोबत जाऊ द्या अन्यथा आम्ही इथून उठणार नाही, प्रवीण दरेकर यांचा इशारा..


काय म्हणाले दरेकर


- विश्वास नांगरे पाटील म्हणतात तुम्हाला जाऊ देतो परंतु दुसरीकडे सर्व कर्मचाऱ्यांना यांनी ठिकठिकाणी अडवून ठेवलं आहे. आम्ही यांच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही


- मी स्वतः एसटी कंडक्टरचा मुलगा आहे. कर्मचाऱ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे मला माहिती आहे. 16 वर्षे काम करून देखील पगार 12 ते 15 हजार आहेत. विलीनीकरण करा अन्यथा माघार नाही


- आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत, त्यामध्ये विलीनीकरण करणं शक्यच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र आता आमची भूमिका बदलली आहे. आम्ही आता माघार घेणार नाही

आमचा विश्वासघात सरकारने केला आहे. सरकार गोंधळ करत आहे- सदाभाऊ खोत 

आमचा विश्वासघात सरकारने केला आहे. सरकार गोंधळ करत आहे. आम्हांला आझाद मैदानात जा असं सांगितलं आणि आता आम्हाला मानखुर्दला अडवून ठेवलं आहे. आम्ही आता इथून हटणार नाही- सदाभाऊ खोत 

खासगी ट्रॅव्हल्सधारकांकडून प्रवाशांची लूट

राज्यातील एस.टी कामगार विलिनीकरणाच्या मागणीसाठी मागील तीन दिवसापासून संप पुकारला आहे.त्यामुळे प्रवासी नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.खासगी ट्रॅव्हल्सधारकांकडून प्रवाशांची लूट जात आहे. त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहे.. यामुळं प्रवाशांमध्ये संतापाची भावना असून राज्य सरकारने कामगारांचा प्रश्न मार्गी लावावा,अशी मागणी करण्यात येत आहे.जादा तिकीट दरातून आमची सुटका करावी.

मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांनी विराट मोर्चाचं आयोजन, राज्यभरातून मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी मुंबईत दाखल

आज मुंबई मध्ये मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांनी विराट मोर्चाचं आयोजन केलं आहे. यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी मुंबईत दाखल होत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईत येण्यासाठी मज्जाव करणार हे लक्षात घेऊन अनेक डेपोतील कर्मचारी रात्रीच मुंबईत दाखल झाले आहेत. 

आमदार सदाभाऊ खोत आणि इतर मोर्चेकऱ्यांना मानखुर्दमध्ये अडवलं


सदाभाऊ खोत आणि इतर मोर्चेकऱ्यांना मानखुर्द येथे पोलिसांनी अडवले

सदाभाऊ खोत आणि इतर मोर्चेकऱ्यांना मानखुर्द येथे पोलिसांनी अडवले. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपला पाठींबा देत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे एसटी कर्मचाऱ्यांसोबत मंत्रालय समोर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहेत. 


मात्र मंत्रालायसमोर मोर्चा काढायला कुठलेही परावनगी नाही, त्यामुळे त्यांना मानखुर्द जवळच पोलिसांनी अडवले आहे

राज्यभरात आत्तापर्यंत 376 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

राज्य सरकारने आता थेट एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात आत्तापर्यंत 376 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार जिल्ह्यात निलंबनाच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच कारवाई झाली तरी संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलीय.

कर्मचारी संपाविरोधात महामंडळ आज अवमान याचिका हायकोर्टात सादर करणार

दुसरीकडे एस.टी. कर्मचारी संपाविरोधात महामंडळ आज अवमान याचिका हायकोर्टात सादर करणार आहेत. एकंदरीतच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची चिन्ह दिसत नाही.

आज एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा

आज एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा निघणार आहे. यासाठी राज्यभरातून एसटी कामगार मुंबईत दाखल होत आहेत. एसटी कामगारी आपल्या मागण्यांसाठी भाजपच्या नेतृत्त्वात आज मंत्रालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करणार आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्याद्वारे एसटी कामगारांना दीर्घ लढाईचं आवाहन केलं आहे.


 
कर्मचारी संपावर ठाम असल्यानं आज तिसऱ्या दिवशीही सेवा ठप्प

ST Workers Strike : जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचारी संपावर ठाम असल्यानं आज तिसऱ्या  दिवशीही एसटी (ST Workers Strike) रस्त्यावर येण्याची शक्यता नाही. याऊलट संप अधिक चिघळणार असल्याचं दिसतयं.

कर्मचारी संपावर ठाम असल्यानं आज तिसऱ्या दिवशीही सेवा

ST Workers Strike : जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचारी संपावर ठाम असल्यानं आज तिसऱ्या  दिवशीही एसटी (ST Workers Strike) रस्त्यावर येण्याची शक्यता नाही. याऊलट संप अधिक चिघळणार असल्याचं दिसतयं.

पार्श्वभूमी

ST Workers Strike : जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचारी संपावर ठाम असल्यानं आज तिसऱ्या  दिवशीही एसटी (ST Workers Strike) रस्त्यावर येण्याची शक्यता नाही. याऊलट संप अधिक चिघळणार असल्याचं दिसतयं.


आज एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा निघणारआहे. यासाठी राज्यभरातून एसटी कामगार मुंबईत दाखल होत आहेत. एसटी कामगारी आपल्या मागण्यांसाठी भाजपच्या नेतृत्त्वात आज मंत्रालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करणार आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्याद्वारे एसटी कामगारांना दीर्घ लढाईचं आवाहन केलं आहे.


तर दुसरीकेडे एस.टी. कर्मचारी संपाविरोधात महामंडळ आज अवमान याचिका हायकोर्टात सादर करणार आहेत. एकंदरीतच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची चिन्ह दिसत नाही.



दरम्यान, राज्य सरकारने आता थेट एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात आत्तापर्यंत 376 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार जिल्ह्यात निलंबनाच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच कारवाई झाली तरी संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलीय.


राज्यभरातील 16 विभागातील 45 आगारामधील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातल्या 18 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. 31 ऑक्टोबर रोजी गणेशपेठ बस स्थानकावर या कर्मचाऱ्यांनी काही राजकीय कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केलं होतं त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. तर चंद्रपूर जिल्ह्यातील 14  संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं प्रशासनाकडून निलंबन करण्यात आलंय. तर नाशिक विभागातील कळवण आगारातील 17 कर्मचारी, वर्धा विभागातील 40 कर्मचारी, गडचिरोली विभागातील 14 कर्मचारी, लातुर विभागातील 31 कर्मचारी, नांदेड विभागामधील आगारातील 58 कर्मचारी, भंडारा आगारामधील 30 कर्मचारी, सोलापुर विभागातील अक्कलकोट आगारामधील २ कर्मचारी, यवतमाळ विभागातील 57 कर्मचारी, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद-१ आगारातील पाच कर्मचारी, परभणी विभागातील आगारातील 10 कर्मचारी, जालना विभागातील जाफ्राबाद व अंबड आगारातील 16 कर्मचारी, जळगाव विभागातील अंमळनेर आगारातील चार कर्मचारी, धुळे विभागातील धुळे आगारातील दोन कर्मचारी, सांगली विभागातील जत, पलुस, इस्लामपुर,आटपाडी आगारातील 585 कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.


संबंधीत बातम्या


ST workers Strike : आंदोलनकर्त्या एसटी कामगारांविरोधात कारवाईचा बडगा; 376 कर्मचारी निलंबित


BLOG : 'लालपरी'च्या सेवकांची फरफट अन् दमनकारी सरकारे!


St workers strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; लोकांना वेठीस धरू नये; अनिल परब यांचे आवाहन

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.