ST Workers Strike Live Updates : एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, वाचा प्रत्येक अपडेट

ST Workers Strike Live Updates : प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचारी कालपासून उपोषणास बसले आहेत मात्र काल यावर तोडगा न निघाल्याने अखेर आजपासून कामावर न जाण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

abp majha web team Last Updated: 28 Oct 2021 10:24 AM
हिंगोली बस स्थानकात शुकशुकाट, एकही बस आगारातून बाहेर गेली नाही, मागण्या मान्य झाल्याशिवाय बस सुरू होणार नाही, कर्मचाऱ्यांचा इशारा

हिंगोली बस स्थानकात शुकशुकाट, एकही बस आगारातून बाहेर गेली नाही, मागण्या मान्य झाल्याशिवाय बस सुरू होणार नाही, कर्मचाऱ्यांचा इशारा

स्वारगेट आगारमधून जाणाऱ्या सर्व बसेस बंद, एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी  तीव्र

एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी  तीव्र


स्वारगेट आगारमधून जाणाऱ्या सर्व बसेस बंद...


बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्याच बसेस फक्त येत आहेत...


दररोज स्वारगेट आगारातून 144 बसेस जातात बाहेर...


मात्र आज एक ही एसटी बस बाहेर पडली नाही...


अचानक एसटी बस बंद असल्याने प्रवाश्यांचे मात्र मोठे हाल

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावर शेकडो प्रवासी गेल्या काही तासांपासून ताटकळत

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून प्रवासी वाहतूक बंद केल्याने प्रवाशांची खूप मोठी अडचण होत आहे... कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावर शेकडो प्रवासी गेल्या काही तासांपासून ताटकळत बसले आहेत...या संपाबद्दल नेमकी माहिती नसल्यामुळे हे प्रवासी बस स्थानकावर आले आणि आता अडकून पडले आहेत....

सातारा एसटी आगारातील सर्व एसटी बंद

सातारा एसटी आगारातील सर्व एसटी बंद


एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बंद


दिवाळीच्या  तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन


 

पालघर विभागातील सहा एसटी डेपो बंद


पालघर विभागातील सहा एसटी डेपो बंद

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता देणे, घरभाडे भत्ता देणे यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कामगारांनी बुधवारपासून उपोषण सुरु केले आहे. पण या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने गुरुवारीही उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीने घेतला आहे. दरम्यान, उपोषणात कामगार सामील झाल्याने राज्यातील ११ आगार पूर्णत: बंद आहेत. तर आंदोलनाला पाठिंबा म्हणून पालघर विभागातील सहा एसटी डेपो बंद ठेवण्यात आले आहेत.


एस.टी.कर्मचारी कृती समितीतर्फे पालघर विभागातील पदाधिकारी व कामगार यांनी उपोषण सुरु केले उपोषण आंदोलन तीव्र झाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पालघर विभागातील पालघर, बोईसर, वसई, अर्नाळा व डहाणू एसटी आगारातील बस सेवा खंडित ठेवली आहे.



विविध मागण्यांसाठी राज्यातील एसटी कामगार संघटनांनी उपोषण सुरु केले असून त्यात एसटीतील १७ संघटना सामील आहेत. महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेतर्फे बुधवारपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ८/१६/२४ टक्के मिळावी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सणउचल १२५०० रुपये मिळावी, राज्य सरकारी कर्मचाऱ्या प्रमाणे वार्षिक वेतनवाढीचा दर तीन टक्के मिळावा, दिवाळी भेट म्हणून १५ हजार रुपयांची नधी मिळावा अशा प्रमुख मागण्यांकरता आमरण उपोषण आंदोलन विभागीय कार्यालयासमोर छेडले आहे.


एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र करून पालघर विभागातील पालघर, बोईसर, वसई नालासोपारा, अर्नाळा, डहाणू या आगारामधील एसटी सेवा बंद ठेवल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. विविध आगारांमधून बाहेर पडणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर देखील परिणाम झाला.

सांगली बसस्थानकात एस टी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी, बस बंद असल्यानं खाजगी गाड्यांनी प्रवास 

सांगली बसस्थानकात एस टी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी, बस बंद असल्यानं खाजगी गाड्यांनी प्रवास 



दिवाळीच्या तोंडावर  एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन,दिवाळी सुट्टीत गावाकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल.

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी  कामबंद आंदोलन सुरू केलेय. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनात विलीन करा ,कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना सेवेत सामावून घ्या अशा विविध मागण्या करत हे आंदोलन सुरू आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे मात्र दिवाळसणासाठी गावाकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

भिवंडी बस डेपोत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा सकाळपासून संप सुरू झाल्याने प्रवाशांचे हाल


नंदुरबार जिल्ह्यातील बस सेवा पूर्णपणे ठप्प

नंदुरबार:-एसटी कर्मचाऱ्यांचा संपाच्या दुसऱ्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यातील बस सेवा पूर्णपणे ठप्प.... विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी तीव्र.... बस सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल.... दिवाळी सणात एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा सर्वसामान्य प्रवाश्यांना फटका...

धुळे बस स्थानकात बाहेरगावाहून आलेल्या बसेस थांबून ठेवण्यात आल्या

राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचे दुसर्‍या दिवशीही आंदोलन सुरूच धुळे बस स्थानकात बाहेरगावाहून आलेल्या बसेस थांबून ठेवण्यात आल्या आहेत.... आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता

भिवंडी बस डेपोत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा सकाळपासून संप सुरू झाल्याने प्रवाशांचे हाल

भिवंडी बस डेपोत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा सकाळ पासून संप सुरू झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे तसेच तुटपुंजा स्वरूपात दिले गेलेले दिवाळी बोनस वाढविण्यात यावा या मागणीसाठी भिवंडी बस डेपोत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून सकाळपासून एकही बस निघालेली नाहीये. त्यामुळे मुंबई व ठाणे दिशेने जाणारे चाकरमानी यांचे हाल होत आहेत. तसेच लांब पल्ल्याचे प्रवासी देखील रखडले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत एकही बस सुटू देणार नाही अशी भूमिका एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

एसटी कर्मचारी कामबंद आंदोलनावर ठाम

एसटी कर्मचारी मात्र आपल्या कामबंद आंदोलनावर ठाम आहेत कालच राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी जाहीर केले होते की जर रात्रीपर्यंत तोडगा निघाला तर आम्ही आजपासून एसटी बंद आंदोलन सुरू करून सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर कदाचित आमच्यावर एसटी बंद करण्याची वेळ आली नसती 

मुंबईत सध्या गाड्या सुरू आहेत. दुपार पर्यत मुंबईतील गाड्या देखील बंद होतील. सध्या कल्याण डेपो बंद करण्यात आला आहे

मुंबईत सध्या गाड्या सुरू आहेत. दुपार पर्यत मुंबईतील गाड्या देखील बंद होतील. सध्या कल्याण डेपो बंद करण्यात आला आहे

आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कामगार आक्रमक, राज्यातील 250 पैकी 100 डेपो एसटी कामगारांकडून उत्स्फूर्तपणे बंद

आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कामगार आक्रमक


राज्यातील 250 पैकी 100 डेपो एसटी कामगारांकडून उत्स्फूर्तपणे बंद


विदर्भ, मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रात संपाचा प्रचंड जोर


जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा कामगारांचा इशारा


परिवहन मंत्र्यांसोबत फिस्कटलेल्या चर्चेनंतर कामगारांकडून उत्स्फूर्तपणे संप घोषित


मुंबईतील आझाद मैदानात राज्यभरातील संयुक्त कृती समितीकडून उपोषण सुरूच


ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रवाशांची मोठी अडचण होणार

अडीच हजार रुपये दिवाळी भेट आणि महागाई भत्त्यात वाढ देण्याच्या निर्णयावर एसटी कामगार संघटनांची नाराजी

मुंबई : अडीच हजार रुपये दिवाळी भेट आणि महागाई भत्त्यात वाढ देण्याच्या निर्णयावर एसटी कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता मिळावा या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज  पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. कर्मचा-यांचे आंदोलन तीव्र झालं तर दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.  दिवाळी तोंडावर असतान  एसटी कर्मचा-यांच्या मात्र तोंडचा घास पळाला आहे निराशेनं आणि आर्थिक विवंचनेनं आतापर्यंत 26 एसटी कर्मचा-यांनी  आत्महत्या केली आहे.  

अखेर एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू 

प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचारी कालपासून उपोषणास बसले आहेत मात्र काल यावर तोडगा न निघाल्याने अखेर आजपासून कामावर न जाण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.  बीड माजलगाव परळी अंबाजोगाई या बस स्थानकातून आज येथे एसटी सकाळपासून बाहेर गेलेली नाही.  जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही एसटी बाहेर काढणार नाही या निर्णयावर एसटी कर्मचारी ठाम आहेत

पार्श्वभूमी

ST Mahamandal BUS Employee : अडीच हजार रुपये दिवाळी भेट आणि महागाई भत्त्यात वाढ देण्याच्या निर्णयावर एसटी कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता मिळावा या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज  पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. कर्मचा-यांचे आंदोलन तीव्र झालं तर दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.  दिवाळी तोंडावर असतान  एसटी कर्मचा-यांच्या मात्र तोंडचा घास पळाला आहे निराशेनं आणि आर्थिक विवंचनेनं आतापर्यंत 26 एसटी कर्मचाऱ्यांनी  आत्महत्या केली आहे.  


अखेर एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू 
प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचारी कालपासून उपोषणास बसले आहेत मात्र काल यावर तोडगा न निघाल्याने अखेर आजपासून कामावर न जाण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.  बीड माजलगाव परळी अंबाजोगाई या बस स्थानकातून आज येथे एसटी सकाळपासून बाहेर गेलेली नाही.  जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही एसटी बाहेर काढणार नाही या निर्णयावर एसटी कर्मचारी ठाम आहेत


काय आहेत एस टी कर्मचा-यांच्या मागण्या



  • महागाई भत्ता देण्यात यावा

  • वार्षिक वेतनवाढ ही दोनवरून टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात यावी. 

  • घरभाडे भत्ता 8, 16, 24 % प्रमाणे देण्यात यावे.

  • दिवाळीपूर्वी वेतन मिळावे 



महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्या अन्यथा संप करू असा इशारा ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला आहे. त्यामुळे जरा ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला तर राज्यातील ग्रामीण भागात प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकार आता नेमकी काय भूमिका घेत याकडे लक्ष लागलं आहे. 



 


मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करा. राज्य परिवहन महामंडळ हा महाराष्ट्रातील अस्मिता आणि मराठी बाणा जपणाऱ्या मराठी जनतेच्या अत्यावश्यक सेवेतील एक घटक आहे, जो खेड्यापासून महानगरांपर्यंत अस्तित्वात आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य असलेले एसटी महामंडळ अपेक्षांची नोंद घेऊन महामंडळाची सेवा प्रवासाभिमुख आणि समाजाभिमुख हेतू साध्य करत आहे, महामंडळाला तोटा होत असल्यानं महामंडळ प्रवाशांची उत्तम प्रकारे सेवा करण्यास अपुरं पडत असल्याचं दिसून येत आहे. एसटी महामंडळाला अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्य शासनात विलिन केल्यास महाराष्ट्र शासन अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असं पत्रात म्हटलं आहे. 


वेतनासाठी राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा कुटुंबियांसह 'आक्रोश', इंटक संघटनेसह भाजप आक्रमक


 


पत्रात म्हटलं आहे की, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल, गुजरात राज्यातील परिवहन महामंडळास राज्य शासन चालवते. महामंडळातील कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणं वेतन, भत्ते , सोई सवलती दिल्या जातात. महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन भत्ते देण्याचे आश्वासन दिले होते. याची प्रत्यक्ष अमलबजावणी व्हावी, अशी मागणीही यात करण्यात आली आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.