नागपूर : नागपूरच्या विजय टॉकिजमध्ये प्रेक्षकांच्या असंवेदनशीलतेचा कळस पाहायला मिळाला. सिनेमागृहात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तो सीटखाली कोसळला. मात्र एकाही प्रेक्षकानं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे संपूर्ण शोदरम्यान प्रेक्षकांनी प्रेतासोबत सिनेमा पाहिला.


नागपूरच्या विजय टॉकिजमध्ये 'तन मन धन' नावाचा सिनेमा सुरु असतानाच एका 65 वर्षीय प्रेक्षकाचा मृत्यू झाला. शरद नावाच्या प्रेक्षकाचं प्रेत सीटजवळ पडलं. मात्र कुणीही त्याकडे लक्ष देण्याची तसदी घेतली नाही. थिएटरच्या व्यवस्थापकानं पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा केला. मात्र यावेळीही प्रेक्षक सिनेमा पाहण्यात मश्गुल होते.

दरम्यान शरद यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकारानंतर प्रेक्षकांची असंवेदनशीलता नागपुरात चर्चेचा विषय ठरली आहे.