बेळगाव : 'जय महाराष्ट्र' लिहिण्यात आलेली महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली एसटी बेळगावात दाखल झाली. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बसचं जंगी स्वागत केलं. तसंच बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना पुष्पगुच्छ आणि भगवा फेटा घालून स्वागत केलं.


कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी कर्नाटकात 'जय महाराष्ट्र' म्हटल्यास लोकप्रतिनिधींचं पद रद्द करण्याचा कायदा करण्याची धमकी दिली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्राचे परिवाहन मंत्री दिवाकर रावते यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक एसटी बसवर जय महाराष्ट्रात लिहिण्यात येईल, अशी घोषणा केली होती.

त्याप्रमाणे आज (शुक्रवार) सकाळी मुंबईहुन निघालेली मुंबई-बेळगाव बस रात्रीसाडे नऊच्या दरम्यान बेळगाव स्थानकावर पोहोचली. यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी ड्रायव्हर, कंडक्टरला फेटा बांधून प्रवाशांना पेढे वाटले.

एसटीचा नवीन लोगो

एसटीच्या लोगोमध्ये बदल करण्यात आले आहे. मूळ लोगोच्या खाली ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिण्यात आले असून, महाराष्ट्राच्या नकाशाचाही या लोगोत समावेश करण्यात आला आहे.



संबंधित बातम्या

दिवाकर रावतेंनी 'करुन दाखवलं', एसटीवर 'जय महाराष्ट्र'

आता राज्यातील प्रत्येक एसटीवर 'जय महाराष्ट्र'ची पाटी

‘जय महाराष्ट्र’च्या फतव्याविरोधात मोर्चा, शिवसेना मंत्र्यांना कोल्हापुरातच रोखलं!

कर्नाटक मंत्र्याविरोधात बेळगावात मराठीजनांचा मोर्चा

अरेरावीची भाषा खपवून घेणार नाही, चंद्रकांत पाटलांचा रोशन बेगना सज्जड दम

शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’चे स्टिकर्स

‘जय महाराष्ट्र’ बोलल्यास पद रद्द, बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींची गळचेपी