रत्नागिरी : राजापूरजवळच्या हातीवलीमध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.
या भीषण अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जुवाटी -राजापूर आणि विद्यार्थी स्पेशल एसटी गाड्यांमध्ये हा अपघात झाला.