दहावीची बोर्डाची परीक्षा 7 मार्च ते 29 मार्च 2016 दरम्यान होत आहे. एसएससीची परीक्षेचं वेळापत्रक 28 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आलं. 20 ते 23 मार्च 2017 या दरम्यान दहावीचे चार पेपर सलग आहेत. त्यामध्ये विज्ञान भाग 2, इतिहास-नागरिक शास्त्र, भूगोल-अर्थशास्त्र आणि आयसीटीचा (Information and Communication Technology) पेपर आहे.
'दहावीच्या वेळापत्रकात बदल करा'
असं होतं वेळापत्रक!
मात्र या सलग वेळापत्रकामुळे पेपरमध्ये एक दिवसाचे अंतर नसल्याने अभ्यास कसा करणार, असा प्रश्नं विद्यार्थ्यांसमोर निर्माण उभा राहिला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना या पेपरच्या दरम्यान सुट्टी हवी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.
दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
शिक्षण परिषदेचे सदस्य अनिल बोरनारे यांनी दहावीच्या वेळापत्रकात बदल करा, अशी मागणी बोर्डाकडे केली आहे. त्याबाबतचं पत्र त्यांनी बोर्डाला पाठवलं आहे. तसंच शिक्षक आमदार कपिल पाटील दोन पेपरमध्ये अंतर ठेवण्याची मागणी केली होती.
याची दखल घेतल शिक्षक आयुक्तांनी वेळापत्रकात बदल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भातील अधिक माहिती https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे.