मुंबई: दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात नवा कोरा आणि अभिमानास्पद धडा समावेश करण्यात आला आहे. मराठीच्या पुस्तकात वीरपत्नी  लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची यशोगाथा सांगण्यात आली आहे.


लेफ्टनंट  स्वाती महाडिक या शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आहेत. कर्नल संतोष महाडिक हे जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी दोन हात करताना शहीद झाले होते.

अभिमानाचे दोन स्टार खांद्यावर, वीरपत्नी स्वाती महाडिक 'इंडियन आर्मी'त रुजू


पतीच्या वीरमरणानंतर उच्चशिक्षीत स्वाती यांनीही खडतर प्रशिक्षण घेऊन, सैन्यात जाणंच पसंत केलं.  स्वाती महाडिक गेल्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत. त्यांची प्रेरणादायी कहाणी दहावीच्या पुस्तकात सांगण्यात आली आहे.

सातारा आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे.

पती निधनाचे असीम दु:ख बाजूला ठेवून, पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगणेला सादर प्रणाम, अशी गौरवगाथा दहावीच्या पुस्तकात मांडण्यात आली आहे.

'माझी मुलगी आणि मुलगा लष्करातच जातील' वीरपत्नीचा निर्धार


नुकतीच दहावीची नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकं बाजारात उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे दहावीचे उन्हाळी वर्गही सुरुवात होत आहेत.

गेल्या वर्षापर्यंत दहावीच्या सर्व पुस्तकांचा संच 577 रुपयांना होता,  आता तो 614 रुपयांना उपलब्ध आहे. एका संचामागे  37 रुपयांची वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या

BLOG : आजमाले...



देखना है जोर कितना...शहीद महाडिकांची पत्नी 'इंडियन आर्मी'त !

'माझी मुलगी आणि मुलगा लष्करातच जातील' वीरपत्नीचा निर्धार