मुंबई: परीक्षेआधी तुम्ही पेपर फुटल्याच्या अनेक बातम्या पाहिल्या, ऐकल्या असलीत. पण येत्या वर्षात प्रकाशित होणारी दहावीची नव्या अभ्यासक्रमाची पुस्तक प्रकाशनाआधीच फुटली आहे.


नव्या अभ्यासक्रमाचं विज्ञान भाग १ आणि भाग २ ची पुस्तकं सोमवारी व्हॉट्सअपवर व्हायरल झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

येत्या शैक्षणिक वर्षात दहावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तकं तयार करण्याची जबाबदारी बालभारतीकडे आहे. मात्र गाईड बनवणाऱ्या कंपन्यांना फायदा व्हावा, कोचिंग क्लासेसला आधीच अभ्यासक्रम मिळावा या उद्देशानं ही पुस्तकं फोडली गेल्याचा संशय आहे.

दरम्यान या घटनेनंतर आता बालभारतीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं निर्माण झालं आहे.

यापूर्वी नववी ते बारावीच्या पुस्तकांची निर्मिती राज्य शिक्षण मंडळाकडे होती. यंदा दहावीच्या पुस्तकनिर्मितीचं काम बालभारतीकडे आहे. या पुस्तकाची छपाई अजून बाकी आहे. ही छपाई शिल्लक असतानाच पुस्तक व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालं आहे.