गडचिरोली : देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत निर्णय अधिकाऱ्यांवर फोनवरुन चिन्ह देण्यास दबाव टाकल्याच्या प्रकरणात पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वडसा देसाईगंज न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी जानकरांची निर्दोष मुक्तता केली.
देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवडणूक चिन्हासंदर्भात फोनवरुन दबाव आणल्याबाबतचा महादेव जानकरांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर जानकरांवर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातून न्यायाधिश के आर सिघेल यांनी सबळ पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली.
माजी नगराध्यक्ष जेसाभाई मोटवानी हेही जानकरांबरोबर निर्दोष सुटले आहेत.
2016 च्या डिसेंबर महिन्यात देसाईगंज नगरपालिकेची निवडणूक होती. त्याआधी म्हणून 5 डिसेंबरला महादेव जानकर हे देसागंजमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी प्रभाग क्रमाक 9-ब मधील काँग्रेसचे उमेदवार जेसाभाई मोटवानी यांना नामनिर्देशनपत्र मागे घेऊ देऊन, त्यांना कपबशी हे चिन्ह देण्यासाठी जानकरांनी दबाव आणला, असा आरोप होता. त्यासंदर्भात एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.