कोल्हापूर : उंची नाही म्हणून बाईक चालवू न शकणाऱ्या कोल्हापुरातल्या एका भावानं चक्क आपल्या उंचीची बाईक बनवली आहे. विशेष म्हणजे या बाईकची कोल्हापुरात फुल्ल हवा आहे. या बाईककडे बघून भल्या भल्यांचे डोळे फिरले आहेत.


भावा नादच खुळा...! तेचं काय झालं म्हाईत हाय काय? आमच्या भावाला बी गाडी चालवायची होती... पन उंची आडवी आली ओ.... मग काय...? भावानं च्यालेन्ज घेतलं... काय बी झालं तरी गाडी तयार करायचीच... दोस्त बी म्हनाले हान गाडी जोरात...

पन भावा... हे काय आटवड्यात झालेलं न्हाई... दोन वर्षं लागली राव... पार मेदूला अॅटॅक आला... पन दोन वर्षांनं जे काय तयार झालंय कनी... ते लईच भारी हाय... आस्वले मिस्त्रींची कमाल ओ...

आता जेवडी उंची... तवडची बाईक पायजेल... गेर बी तवडाच... हँडल बी तवडच... बारकं आसलं म्हनू काय झालं... भल्या भल्या गाड्यास्नी आमची डार्लींग मागं टाकतिया...

भावाची राईड... आनी कोल्हापूरचं वातावरण टाईट... 110 सीसी इंजिन हाय, 4 गेर हाईत... रिवर्सबी गेर हाय... डोळं पांडरं पडतील यवडं लाईट हाईत, ब्रेक आसला... की गाडी जागच्या जागी थांबलं...

भावाकडनं आमी बी एक राईड घेतली... आणि शायनिंग मारुन घेतलं... तुमच्याकडं आसतील ओ लाखाच्या गाड्या... पन दोन वर्षं डोकी भाजून, स्कीमा करुन, पिट्टा पाडून तयार झालेली गाडी फक्त आमच्याकडंच हाय...

म्हनून भावा... एकच म्हनतो आता... तुजं एकटच्याचं खटक्याव बोट, बाकी सगळ्यांच्या गाड्या जाग्याव पल्टी...!

पाहा स्पेशल रिपोर्ट :