लातूर: महाराष्ट्रात मैदानात हजेरी लावून 81 हजार मुलांना खेळाचे गुण मिळाले आहेत. कलेच्या क्षेत्रात प्राविण्य दाखवल्याने 17 हजार मुलांना वाढीव गुणांचा लाभ झाला. अशा वाढीव गुणवत्तेमुळ यावर्षी बहुतेक नामवंत कॉलेजमध्ये 11 वीच्या प्रवेशाची कटऑफ 98 टक्क्यांच्या खाली येण्याची शक्यता नाही.
ही शुध्द फसवणूक असून गुणदानातून होणाऱ्या लाखोच्या उलाढालीची प्रसंगी सीबीआय चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेनं केली आहे.
खेळ आणि कला विषयातले गुण हे महाराष्ट्राच्या वाढलेल्या गुणवत्तेचं खर सत्य. वाढीव गुणांची अशी खैरात सुरु आहे की 100 टक्केहून अधिक गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी दिसतील. या वर्षी तर कमाल झाली. महाराष्ट्रात 81 हजार मुलांनी खेळाचे गुण मिळवले. म्हणजे पालकांनी दहावीच्या वर्षात आपल्या पाल्याला खेळाच्या मैदानावर पाठवण्याच उमेदपणा दाखवला. त्यातून जिल्हा स्तरावर सहभागींना 10, विभागीय स्तरावरील विद्यार्थ्यांना 15 आणि राज्य स्तरावरच्या विद्यार्थ्यांना 24 गुणांचा लाभ झाला.
या वर्षी खेळाबरोबरचं कला क्षेत्राचाही गुणदानासाठी सहभाग वाढवण्यात आला. कलेत सहभागी 16 हजार 492 विद्यार्थ्यांना वाढीव गुणांचा लाभ झाला.
त्यातमध्ये -
चित्रकला- 14 हजार 812
शास्त्रीय संगीत- 110
वाद्य वादन- 107
नृत्य- 274
बाल नाटके- 12
असे गुणवंत विद्यार्थी आहेत.
लातूरच्या शाहू आणि दयानंद महाविद्यालयात 11 वीच्या प्रवेशासाठी राज्यभरातून गर्दी होते. वाढीव गुणांमुळं 11 वी प्रवेशाची कटऑफ 98 टक्क्यांच्या खाली येण्यास तयार नाही. राज्यातल्या नामवंत महाविद्यालयत हेच होणार आहे.
सीबीएससी आणि आयसीएससीच्या वाढीव गुणांना उतारा म्हणून एसएससी बोर्डानं खेळ, कलेच्या गुणांची खैरात केली. फुगलेल्या गुणवत्तेचे खरे लाभार्थी पालक आणि पाल्य आहेतच. याचा अधिक फायदा होतोय तो पॉलिटेक्निक, इंजिनअरिंग, मेडिकल आणि इतर व्यावयासायिक अभ्यासक्रम चालवणाऱ्यांना. शिक्षण मंत्र्यांच्याही डोक्याला ताप नाही. दरवर्षी गुणवत्ता वाढत जातेय. प्रश्न कोण आणि कशाला विचारेल.
निशांत भद्रेश्वर, राहुल कुलकर्णी, एबीपी माझा