मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा अंतिम निकाल (Shiv Sena MLA disqualification) काही तासांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)  आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीने नवा वाद उफाळल आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray on Rahul Narvekar) यांच्या शिवसेनेने थेट सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेऊन नार्वेकर-शिंदे यांच्या भेटीवर आक्षेप घेतला आहे. त्याबाबत आता राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


राहुल नार्वेकर म्हणाले, "असे आरोप केवळ दबाव टाकण्यासाठी केले जात आहेत. मुख्यमंत्री यांना अध्यक्ष कोणत्या कामासाठी भेटू शकतात याची कल्पना माजी मुख्यमंत्री यांना असायला हवी असे माझं मत आहे. तरी ते का आरोप करत आहेत यामागील हेतू स्पष्ट होतो. आमदार म्हणून माझ्या मतदारसंघाची कामं असतात.  मुख्यमंत्र्यांच्यासोबत माझी बैठक 3 तारखेला नियोजित होती. पण मला कोरोना इन्फल्यूयेनजाची लागण झाली त्यामुळे मी भेटू शकलो नाही. कुलाबाच्या ब्रिजबाबत चर्चा करायची होती. दक्षिण मुंबईतील आठ रस्त्याचा मुद्दा होता. हे सर्व विषय घेऊन मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो, असं राहुल नार्वेकर म्हणाले. 


विधिमंडळातील कंत्राटी कामगार याबाबत भेट होती. जे स्वतः माजी मुख्यमंत्री होते, ज्यांना विधानसभा अध्यक्ष यांच्या कार्याची माहिती आहे त्यांनी असे आरोप करणे चुकीचे आहे. आज मी व्हीआयपी लाँजमध्ये अनिल देसाई आणि जयंत पाटील यांना भेटलो. ती काय राजकीय भेट होती का? मी अनेकदा अनेकांना भेटतो ती काय राजकीय भेट असते का? मी त्यांना भेटू नये असा अर्थ होतो का, असे प्रश्न राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले.  


एकनाथ शिंदेंची भेट का ?


आमदार म्हणून माझ्या मतदार संघाची काम असतात. माझी मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक 3 तारखेला नियोजित होती. पण मला कोरोना इन्फल्यूयेनजाची लागण झाली,  त्यामुळे मी भेटू शकलो नाही. कुलाबाच्या ब्रिजबाबत चर्चा करायची होती. दक्षिण मुंबईतील आठ रस्त्याचा मुद्दा होता, हे सर्व विषय घेऊन मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. विधिमंडळातील कंत्राटी कामगार याबाबत भेट होती, असे राहुल नार्वेकर म्हणाले. 


त्या व्यक्तीवर दबाव टाकण्यासाठी आरोप होतात - 


जे स्वतः माजी मुख्यमंत्री होते, ज्यांना विधानसभा अध्यक्ष यांच्या कार्याची माहिती आहे. आज मी व्हीआयपी लाँजमध्ये अनिल देसाई आणि जयंत पाटील यांना भेटलो. ती काय राजकीय भेट होती का? मी अनेकदा अनेकांना भेटतो, ती काय राजकीय भेट असते का? मी त्यांना भेटू नये असा अर्थ होतो का? आरोप जेव्हा बिनबुडाचे होतात, त्यावेळी त्या व्यक्तीवर दबाव टाकण्यासाठी आरोप होत असतात, असे राहुल नार्वेकर म्हणाले. 


निर्णायवर काय म्हणाले नार्वेकर ?


मी सर्वाचा विचार करून निर्णय घेईन. राज्यातील जनतेला न्याय देण्याचा निर्णय घेईन, असे आमदार अपात्रता प्रकरणावर राहुल नार्वेकर म्हणाले. कोर्टात जाण्याचा अधिकार सर्वाना आहे. पण माझ्यावर कोणीही दबाव टाकू शकत नाही. निकाल  दिलेल्या वेळेतच घेऊ, असेही नार्वेकर म्हणाले. 


उद्धव ठाकरे काय म्हणाले ? 









लवाद म्हणून अध्यक्ष महोदय दोन वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घरी जाऊन भेटले आहेत. याचा अर्थ होतो की आरोपीच न्यायाधिशाला जाऊन भेटले. ते मुख्यमंत्र्यांना तसं भेटले तर हरकत नाही पण खटला सुरू असताना ते भेटले. आरोपीला घरी जाऊन भेटणार असतील तर कोणत्या न्यायाची अपेक्षा करणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांची मुलाखत तुम्ही ऐकायला हवी, ते सांगत आहेत की किती वेळ काढला जात आहे. लोकशाहीचा खून यामुळे होतोय की काय अशी परिस्थिती आहे. त्यात ते उघड उघड भेटत आहेत.आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की तुमच्या डोळ्यादेखत हे घडत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


प्रतिज्ञापत्रात काय म्हटले आहे ?


शिवसेना ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीवर आक्षेप घेण्यात आल्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र समोर आले आहे.यामध्ये टाइम्स ऑफ इंडिया आणि एबीपी माझा या बातमीचा संदर्भ शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे


एकनाथ शिंदे यांच्या विरोधात याचिका या प्रकरणात असताना विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून निर्णय 10 जानेवारीला येणे अपेक्षित आहे. या निर्णयाच्या तीन दिवसआधी 8 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जातात ही कृती पूर्णपणे चुकीची असल्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 


सोबतच विधानसभा अध्यक्षांच्या कृतीवर यामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करत विधानसभा अध्यक्ष अशा कृती करत असताना कशाप्रकारे पारदर्शकपणे निकाल देणार ? असा प्रश्न विचारला आहे. सर्वोच्च न्यायालयाला विधानसभा अध्यक्षांची ही कृती रेकॉर्डवर ठेवावी अशी सुद्धा विनंती करण्यात आली आहे.