Soyabean Rates : लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत  (latur agriculture market committee) सोयाबीनला (soyabean rates) सर्वाधिक 7050 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गत अडीच-तीन महिन्यांमध्ये वाढलेला हा सर्वाधिक भाव असून, या वाढीव भावाचा फायदा त्याच शेतकऱ्यांनाच होणार आहे. ज्यांनी सोयाबीन चार महिने बाजारात आणले नाही. आर्थिक सक्षम असलेले शेतकरी यांना वाढीव भावाचा फायदा होणार आहे. मात्र ज्या शेतकऱ्याचे लागवड क्षेत्र कमी त्यांनी सोयाबीन कमी भाव असतानाच विकले आहे . आताही ज्या शेतकऱ्यांना आर्थिक निकड आहे तेच शेतकरी सोयाबीन बाजारात आणत आहेत.


चार दिवसात 1 लाख क्विंटलपर्यंत माल बाजारपेठेत दाखल


या भाववाढीचा फायदा घेत मागील चार दिवसात 1 लाख क्विंटल पर्यंत माल बाजारपेठेत दाखल झाला आहे . भाव वाढ अशाच गतीने होत राहिली, तर मालाची आवक वाढेल आणि भाव पुन्हा कमी होतील असा ही अंदाज बांधला जात आहे. याच कारणामुळे बाजारात लवकर माल आणला जात आहे. ही तेजी तीन महिन्यानंतर आली आहे. आता हीच तेजी किती काळ राहील? हे सांगता येत नसल्यामुळे शेतकरी बाजारपेठ जवळ करत आहेत. राज्यात लातूरच्या बाजारपेठेत सोयाबीनला कायमच उच्च दर मिळाला आहे.  दहा हजाराचा पल्ला गाठलेले सोयाबीन चे दर काही काळानंतर पडले होते. दर अद्याप त्या प्रमाणात वाढले नाहीत. यामुळे बाजारात सोयाबीनच्या आवकवर परिणाम झाला होता. मात्र मागील चार दिवसात दरात काही प्रमाणात वाढ होत असल्यामुळे आवकही वाढली आहे सोयाबीन चार महिन्यानंतर प्रथमच सात हजार पार गेले आहे.


तोच भाव पुन्हा मिळेल?


लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचीव भास्कर शिंदे यांनी सांगितले,  हंगामाच्या मानाने माल कमी येत आहे. गतवर्षी सोयाबीनला मिळालेला उच्चांकी भाव त्यास कारणीभूत आहे. मागील चार दिवसात 1 लाख क्विंटल माल दाखल झाला आहे. सोयाबीनच्या दराने 10 हजाराचा पल्ला गाठला होता. तोच भाव पुन्हा मिळेल ही आशा आता धूसर होताना दिसत आहे. आला तो उच्चांकी दर पदरात पाडून घ्यावा याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे. ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे त्यांनाच लाभ मिळणार आहे.  बाकीच्या शेतकऱ्यांनी माल तेव्हाच विकला आहे. अशी माहिती मिळत आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: