गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातल्या सरांडी गावात आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सरांडी गावात एका व्यक्तीनं स्वत:च्याच आईची निर्घृणपणे हत्या केली आहे.
आज दुपारी शाळेच्या परीसरात स्वत:च्याच आईला सुभाष रोकडे नामक व्यक्तीनं लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे. गोंदियाच्या सरांडी गावातील या मारहाणीत सुभाषची आई सुदैवानं बचावली होती. पण सुभाषनं आईच्या अंगावर ट्रक्टर चढवत तिची हत्या केली आहे.
माथेफिरु सुभाष रोकडेनं आईची हत्या केल्यावर तिरोडा पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे.