सोलापूर : अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाच्या वर्षीचा मानाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. दरवर्षी विद्यापीठातर्फे विविध पुरस्कार जाहीर केले जातात. यामध्ये विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाच्या वर्षीचा हा मानाचा पुरस्कार अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांना घोषित करण्यात आला. 


#EXCLUSIVE निसर्ग साहित्यिक मारुती चितमपल्लींसोबत रानगप्पा! चितमपल्ली यांच्या मनात कोणती खंत?


डॉ. मारुती चित्तमपल्ली हे मूळचे सोलापूरचे आहेत. विदर्भात अनेक वर्षे निसर्ग, पक्षी, वन आणि साहित्य क्षेत्रात अतुलनीय काम केल्यानंतर ते सोलापुरात पुन्हा परतले आहेत. त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अखिल भारतीय विद्यापीठ संघाचे अध्यक्ष कर्नल डॉ. जी. तिरुवसगम हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. 


Special Report | वनपुरूष जंगलातून सोलापुरात का आला? मारुती चितमपल्ली यांचा कर्मभूमीला निरोप


आज 1 ऑगस्ट 2021 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 17 वा वर्धापनदिन समारंभ साजरा होणार आहे. कोरोनाच्या परिस्थिती बंधनांमुळे हा सोहळा ऑनलाईन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. जीवनगौरव पुरस्कार व्यतिरिक्त विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाना तसेच प्राध्यापक, विद्यार्थ्यांना देखील पुरस्कार जाहीर करण्यात आले. 


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे यंदाचे वर्षीचे पुरस्कार


1) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा


2) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार :  प्राचार्य डॉ. रावसाहेब पाटील, के. एन. भिसे महाविद्यालय, कुर्डुवाडी


3) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार: प्रा. डॉ. विकास घुटे, संगणकशास्त्र संकुल, विद्यापीठ कॅम्पस


4) उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार: श्री शशिकांत बनसोडे, कार्यालय अधिक्षक, हिराचंद नेमचंद कॉलेज, सोलापूर.


5) राजश्री शाहू महाराज पुरस्कार: सुलभा गोविंद बनसोडे,  भूशास्त्र संकुल, विद्यापीठ कॅम्पस