सोलापूर : शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाणारे ग्लोबल टीचर प्राईझची नुकतीच घोषणा करण्यात आली. यात जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांची याकरता निवड करण्यात आली आहे. आनंदाची बाब म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील रणजीतसिंह डिसले यांना ही बहुमान देण्यात आला आहे. लंडन येथील वाकी फाऊंडेशनच्या वतीने 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. येत्या मे महिन्यात लंडन येथे होणाऱ्या ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. असा बहुमान मिळवणारे डिसले गुरुजी एकमेव भारतीय ठरले आहेत.
लेट्स क्रॉस द बॉर्डर या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्रायल, पॅलेस्टाईन, अमेरिका आणि उत्तर कोरिया या जगातील सर्वात अशांत देशांतील 50000 मुलांची पीस आर्मी तयार करुन परस्पर सौहार्दाचे वातावरण करण्याच्या या शैक्षणिक प्रयोगाकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे. तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न इतर देशांतील शिक्षकांना प्रेरणादायी आहे, अशा शब्दात निवड समितीने त्यांचा गौरव केला आहे.
रणजितसिंह डिसले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत मागील 11 वर्षांपासून कार्यरत आहेत. रणजीत डिसले गुरुजी हे तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे जगभर ओळखले जातात. जगभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना ते ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करत असतात. डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेड पुस्तके आज 11 देशांतील 10 कोटींहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते 150 हून अधिक देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात. अशा पद्धतीने अध्यापन करणारे ते जगातील सातवे शिक्षक ठरले आहेत. मायक्रोसॉफ्ट, नॅशनल जिओग्राफिक सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी रणजितसिंह डिसले यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
सोलापूरचे झेडपी शिक्षक रणजितसिंह डिसले जगातील सर्वोत्तम शिक्षकांच्या यादीत
आफताब शेख, एबीपी माझा
Updated at:
20 Mar 2020 10:38 AM (IST)
शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाणारे ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार जाहीर झाले असून जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांची याकरिता निवड करण्यात आली आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील रणजितसिंह डीसले यांचा समावेश आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -