Solapur : 100 वर्षाहून अधिक काळ झालेला सोलापुरातील रेल्वे पूल अखेर इतिहासजमा झाला आहे. 1922 साली बांधण्यात आलेला रेल्वे पूल आज काढण्यात आला आहे. सकाळपासून दोन मोठ्या क्रेन, 4 जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर इत्यादी साहित्यांचा वापर करुन रेल्वे पूल पाडला आहे. मागील चार दिवसापासून रेल्वे पुलावरील डांबरी रोड ब्रेकर आणि जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आले होते. आज सकाळपासून रेल्वेचा 12 तासांचा मेगाब्लॉक घेऊन पुलाचे लोखंडी गर्डर क्रेनच्या साह्याने काढण्यात आले. 

Continues below advertisement

 रेल्वे पुलाच्या कामामुळं आज सकाळपासून सोलापुरातील रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत

दरम्यान, या रेल्वे पुलाच्या कामामुळं आज सकाळपासून सोलापुरातील रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. पुढील 2 ते 3 तासात ही सेवा पूर्ववत होईल अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांनी दिली आहे. दरम्यान 103 पूर्वीचा हा रेल्वे पूल हटवल्यानंतर पुन्हा याच जागी सुमारे 35  कोटी रुपये खर्च करून नवीन पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांनी दिली आहे. येत्या वर्षाभरात या नवीन पुलाचे काम होणार असल्याची माहिती योगेश पाटील यांनी दिली आहे. 

सोलापुरमधील मध्यवर्ती भागातील दोन महत्वाचे रस्ते बंद

सोलापुरमधील मध्यवर्ती भागातील दोन महत्वाचे रस्ते (Solapur News) वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. सोलापुरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मरीआई चौक दरम्यान 1922 साली बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल आजपासून 14 डिसेंबर पाडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पुलाचे आयुष्य संपल्याने रेल्वे प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने हे पूल पाडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसरा हा पूर पाडण्यात आला आहे. नवीन पूल बांधण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मरीआई चौक हा रस्ता तब्बल एक वर्षासाठी बंद असणार आहे. दुसरीकडे शहरातील विजयपूर रोडवरील धर्मवीर संभाजी महाराज तलाव जवळ असलेल्या पुलाजवळ रेल्वेने तांत्रिक काम हाती घेतलंय.  आज 14 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 ते रात्री 7.30 असा तब्बल 11 तासांचा मेगा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान सोलापूर यार्डातील सर्व ये-जा मेन लाईन आणि लुपलाईनवर वाहतूक बंद राहणार आहे. या ब्लॉकचा परिणाम म्हणून 9 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर 9 रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. 15 ते 18 डिसेंबर रोजी देखील काही वेळाचा ब्लॉक असल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. (Solapur Traffic News)

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Solapur News: सोलापुरात 100 वर्ष जुना पूल पाडणार, इंद्रायणी, उद्यान, कन्याकुमारी, कोणार्कसह बहुसंख्य रेल्वेंचे मार्ग बदलले, काही गाड्या रद्द!