Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. फक्त पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शनिवारी संध्याकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ही चिमुकली घरातून अचानक बेपत्ता झाली होती.
माहिती मिळताच पिंपरी–चिंचवड पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री आई कामावरुन घरी आल्यानंतर मुलगी बेपत्ता असल्याचे तीच्या लक्षात आले. माहिती मिळताच पिंपरी–चिंचवड पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. प्राथमिक तपासात उघड झाले की, घरात अनेकदा एकटी राहणाऱ्या चिमुकलीचा फायदा घेत समीर कुमार मंडळ (वय 30 ते 35 विवाहित) या आरोपीने तिला घराजवळच काही अंतरावर नेले. तिथे तिच्यावर बलात्कार करून गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. आज सकाळी चौकशीत संपूर्ण घटना उघडकीस आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या अमानुष कृत्यामुळे मावळ परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
मुंबईच्या कांदिवली पश्चिमेत गुंडाच्या टोळीकडून पोलिसांवर हल्ला
मुंबईच्या (Mumbai) कांदिवली पश्चिमेत आरोपीच्या टोळीकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली पश्चिमेत एकता नगर परिसरामध्ये रात्री नऊच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली. हीच हाणामारी सोडवण्यासाठी आणि ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीच्या टोळीकडूनच हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की या गुंडांना पोलिसांची अजिबात भीती नाही आणि ते धाडसाने पोलिसांवर हात उचलत आहेत.
घटनेनंतर कांदिवली पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी दाखल
सध्या, घटनेनंतर कांदिवली पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी पोहोचला आहे आणि सर्व गुंडांना ताब्यात घेऊन कारवाई करत आहेत. आरोपीच्या टोळीकडून पोलिसांवर हल्ला केल्यामुळे कांदिवली परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, या दोन गटात हाणामारी नेमकी कशामुळं झाली याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, कांदिवलीमध्ये पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कांदिवली पश्चिम एकता नगरमध्ये, मारामारीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर स्थानिक गुंडांनी हल्ला केला होता.
महत्वाच्या बातम्या: