Solapur Pune Railway News : सोलापूर (Solapur) शहरातून पुण्याला ( Pune) जाण्याऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नोकरीसाठी, रोजगारासाठी दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशी पुण्याला जातात. त्यामुळं पुण्याकडं जाणाऱ्या रेल्वे कायम गर्दीने भरलेल्या असतात. दरम्यान, अशातच आता प्रवाशांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. सोमवारपासून (29 जुलै) सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या 4 दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळं आता पुण्याला जाण्यासाठी दररोज दहा ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
सोलापूर पुणे या मार्गावर नॉन इंटरलॉकिंग अन् ट्रॅफिक ब्लॉक
दरम्यान, सोलापूर पुणे या मार्गावर नॉन इंटरलॉकिंग अन् ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रेल्वे गाड्या बंज ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड रेल्वे स्थानक, दौंड कार्ड लाईन, दौंड गुड्स यार्ड आणि दौंड ए केबीन दरम्यानहा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यामुळं पुण्याला जाणाऱ्या गाड्यावर सर्वात जास्त परिणाम होणार आहे. याचा मोठा फटका प्रवाशांना बसणार आहे.
कोणत्या हगाड्या झाल्या रद्द?
नांदेड-पनवेल एक्स्प्रेस
पनवेल - नांदेड एक्स्प्रेस
पुणे - सिकंदराबाद एक्स्प्रेस
सिकंदराबाद - पुणे एक्स्प्रेस
पुणे - सोलापूर एक्स्प्रेस
सोलापूर - पुणे एक्स्प्रेस (12270)
पुणे - सोलापूर (11417)
सोलापूर - पुणे (11418)
या दरम्यान गाड्या राहणार बंद
सोलापू - दौंड डेमू, दौंड-सोलापूर डेमू, पुणे - हरंगुळ एक्स्प्रेस, हरंगुळ - पुणे एक्स्प्रेस, सोलापूर - पुणे डेमू (14222), पुणे - सोलापूर डेमू (11421), अमरावती - पुणे एक्स्प्रेस, 1220 सिकंदराबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद एक्स्प्रेस, पुणे - अमरावती एक्स्प्रेस, अमरावती - पुणे एक्स्प्रेस या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान अचानक रेल्वे गाड्या रद्द केल्यामुळं नाहक लोकांना त्रास सहन कारावा लागत आहे. या मुळं प्रवशांना त्रास सहन कारावा लागत आहे. कधी रेल्वे गाड्या सुटणार असा सवाल रेल्वे प्रवास विचारत आहेत. दरम्यान, सोमवारपासून चार दिवस या गाड्या बंद राहणार आहेत. याचा मोठा फटका रेल्वे प्रशासनाला बसणार आहे. कारण रेल्वेच्या महूसलात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. सध्या राज्यातील बहुंताश ठिकाणी वातावरण खराब आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मुंबई पुण्तात जोरदार पावसामुळं खूप पाणी साचलं होते. यामध्ये काही जणांचा जीव देखील गेला आहे.
महत्वाच्या बातम्या: