Solapur : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात ही घटना घडली आहे. विजय राजकुमार लोंढे (वय 30) प्रियांका विजय लोंढे (वय 28) प्रज्वल विजय लोंढे (वय 5) या तिघांचा झाला मृत्यू झाला आहे. लोंढे कुटुंबीय मूळचे मंगळवेढा तालुक्यातील रहिवासी आहे.
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात धक्कादायक घटना
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात धक्कादायक घटना घडली आहे. शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लोंढे कुटुंबीय मूळचे मंगळवेढा तालुक्यातील आहे. दरम्यान, पती-पत्नीसह लहान मुलगा हे तिघेही शेततळ्यात बुडाले कसे? तिथे नेमकं काय घडलं? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.
नगर - पुणे महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात
अहिल्यानगरच्या केडगाव परिसरात नगर - पुणे महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी शिवाई बस पाठीमागून कंटेनरवर धडकली. कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. धडक इतकी जोराची होती की, यात शिवाई बस चालकाच्या पायाला गंभीर इजा झाली असून ,बसमधील इतर 5 ते 6 प्रवासी जखमी झालेत. तर दोघे जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महत्वाच्या बातम्या: