Bhima Sugar Factory : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (Bhima Sugar Factory) अध्यक्षपदी खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र विश्वराज महाडीक (Vishwaraj Mahadik) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सुरेश जगताप (Suresh Jagtap) यांची कारखान्याच्या  उपाध्यक्षपदी निवड केली आहे. विश्वराज हे महाडिकांच्या तिसऱ्या पिढीतील नेतृत्व असून, त्यांनी अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमधून उच्च शिक्षण घेतले आहे. भीमा कारखान्याच्या निवडणुकीतून त्यांनी राजकारणात पदार्पण केले आहे.


अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी, मला याचा अभिमान


विश्वराज महाडिक यांची भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर एबीपी माझाने त्यांचीशी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले की, दिवंगत भीमराव महाडिक यांनी भीमा कारखाना उभा केला आहे. 1981 या कारखान्याची या कारखान्याची स्थापना झाली. त्यानंतर 2011 साली धनंजय महाडिक यांनी पुन्हा एकदा सत्ता आणली. त्यावेळी आपण अडीच हजार मतांनी विजयी झालो होतो. 2016 मध्ये पाच हजार मतांनी तर  यावेळी सात हजार मतांनी आपला विजय झाल्याचे विश्वराज महाडिक म्हणाले. माझ्यावर अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. मला फार अभिमान वाटत आहे. जबाबदारीचे काम आहे. फार कष्ट करावे लागणार आहे. यासाठी मी तयार असल्याचे विश्वराज महाडिक म्हणाले.




 यावर्षी सात लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार


पुढच्या काळात ऊसाचे जास्तीत जास्त गाळप कसे होईल हे उद्दीष्ट असणार आहे. आता सीजन सुरु आहे. यावर्षी सात लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. लगेच दीड लाख लिटर क्षमतेचा डिस्टलरी प्रकल्प उभा करणार आहे. त्याची आमची तयारी सुरु झाल्याचे विश्वराज महाडिक म्हणाले. सोलापूर जिल्ह्यात नाहीतर राज्यातच भीमा कारखान्याचा नावलौकीक व्हावा, यासाठी काम करणार असल्याचे विश्वराज महाडिक म्हणाले.
 


यावर्षी सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट


भीमा साखर कारखाना निवडणुकीत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या गटाचे सर्वच्या सर्व म्हणजे 15 उमेदवार विजयी झाले आहेत. तर विरोधी गटाच्या राजन पाटील गटाच्या एकाही उमेदवाराचा विजय झाला नाही. शिवाय सर्वच अपक्षांना देखील पराभव पत्करावा लागला आहे. महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत स्वत: धनंजय महाडिक आणि त्यांचे पूत्र विश्वराज महाडिक देखील रिंगणात होते.  


धनंजय महाडिक यांची हॅट्रीक 


भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या गटाचे सर्वच्या सर्व म्हणजे 15 उमेदवार विजयी झाले होते. तर विरोधी गटाच्या राजन पाटील गटाच्या एकाही उमेदवाराचा विजय झाला नव्हता. शिवाय सर्वच अपक्षांना देखील पराभव पत्करावा लागला होता. महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत स्वत: धनंजय महाडिक आणि त्यांचे पूत्र विश्वराज महाडिक देखील रिंगणात होते. भीमा सहकारी साखर कारखाना जिंकत धनंजय महाडिकांनी विजयी हॅट्रिक केली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


धनंजय महाडिकांच्या पॅनलचा दणदणीत विजय, विरोधकांचा सुफडा साफ