Solapur : माढा तालुक्यातील कुर्डू येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फोनवरुन झालेल्या वादंगावर माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांनी जोरदार तोफ डागली होती. या गावात बीडपेक्षा भयानक दहशत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. कुर्डूची तुलना थेट बीडच्या प्रकरणाशी केल्यामुळं कुर्डूचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गावाची बदनामी करणाऱ्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाने केलेल्या चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ उद्या कुर्डू बंदची हाक देण्यात आलेली आहे. उद्या संपूर्ण गाव एक मुखाने बंद पाळणार आहे. 

Continues below advertisement


बेकायदा मुरूम उपशा प्रकरणी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी याच गावात कारवाई केली होती यावेळी अजित पवार यांनी फोनवर त्यांना धमकावले होते. यानंतर राज्यभरातून अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठू लागल्यावर त्यांनी ट्विट करत आपला असा उद्देश नसल्याचा खुलासा केला होता.


मोहिते पाटील यांचे वक्तव्य व प्रशासनाकडून झालेली चुकीची कारवाईच्या विरोधात उद्या कुर्डू बंदची हाक


यानंतर या प्रकरणावर बोलताना माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डू गावाची परिस्थिती बीड पेक्षा भयानक असल्याचे म्हटले होते. तसेच संपूर्ण गाव दहशतीत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आपल्या गावाला बीडची उपमा दिल्याने सर्वच पक्षाचे ग्रामस्थ एकत्र आले असून त्यांनी मोहिते पाटील यांचे वक्तव्य व प्रशासनाकडून झालेली चुकीची कारवाई याच्या विरोधात उद्या कुर्डू बंदची हाक दिली आहे


नेमके प्रकरण काय? 


बेकायदा मुरूम उपसा प्रकरणी कुर्डू येथे कारवाईला आलेल्या महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष बाबा जगताप यांनी लावून दिला होता. याच फोनवर बोलताना अजित पवार यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर कारवाईला आलेले तलाठी तहसीलदार यांच्यावरही ग्रामस्थांनी शिवीगाळ करत हल्ल्याचा प्रयत्न केला होता. हे सर्व व्हिडिओ समाज माध्यमात वायरल झाल्यावर खूप मोठी टीका राज्यभरातून सुरू झाली होती. नंतर राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या आणि या गुन्ह्यात आरोपी असलेल्या बाबा जगताप याचा नशा करतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्याने खूपच खळबळ उडाली होती. अजितदादांना जोडून दिलेला फोन बाबा जगतापचा नसून त्याने एका नेत्याला फोन करून अजितदादांना कॉन्फरन्स कॉलवर घेतल्याचा गौप्यस्फोट खासदार मोहिते पाटील यांनी केला. वास्तविक मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांसारखे वरिष्ठ कधीही थेट फोन न करता जिल्हाधिकारी अथवा पोलीस अधीक्षकांना बोलत असतात. मात्र फोन जोडून देणाऱ्या दुसऱ्या नेत्याने अजित दादांना थेट बोलण्यास भाग पाडल्याने त्यांना प्रोटोकॉल सोडून बोलावे लागल्याचेही मोहिते पाटील यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वर्तन करणे गरजेचे असताना अशा पद्धतीने फोनवर बोलणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.


महत्वाच्या बातम्या:


कुर्डूमध्ये मुरूम माफियांची बीडपेक्षा मोठी दहशत; खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचे अनेक गौप्यस्फोट, थेट मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी