Manoj Jarange Patil : दुष्ट विचाराचा नेता ओबीसीला नेता लाभला आहे. वेगळे चॉकलेट देऊन नेते कामाला लावतो, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका केली. त्यांना वाटतं त्याच्यासारखं सगळं चालावं असे जरांगे म्हणाले. आम्ही सर्व लोकशाही मार्गाने करतो असेही जरांगे पाटील म्हणाले. लोकशाही मार्गाने आम्ही सर्व मिळवणार आहेत तुला काय करायचं ते कर अशी टीका जरांगेंनी केली. आम्ही पहिलेच कुणबी ओबीसीच्या यादीत आहोत ओबीसीच्या आरक्षणात आहोत असे जरांगे म्हणाले. 

Continues below advertisement

16 टक्के आरक्षण ओबीसीचं ते पण मागे घ्या असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळे सुद्धा तणाव होऊ शकतो. आमचं होतं तर आम्ही खाऊ दिलं असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 180 जातीच्या साडेचारशे जाती कशा झाला?  हे सुद्धा सरकारने सांगावं असे जरांगे म्हणाले.  मराठा समाज पुढारलेला आहे, तो मागस नाही असे भुजबळ म्हणाले होते, त्यांच्या टीकेला उत्तर देताना जरांगे म्हणाले की, तू काय कमी पुढारलेला आहेस का? तुझ्या प्रत्येक गावात जमिनी आहेत असे जरांगे म्हणाले. भुजबळांनी गोरगरीब ओबीसींना वेड्यात काढलं आहे. तुला रस्त्यावर उतरु नको केव्हा म्हटलं, तुला जिंदगीत दुसरं काय आलं? असा सवाल जरांगेंनी केला.  आरक्षणासाठी उतरायचं आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा असेही ते म्हणाले. सरकारने भुजबळांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. तू म्हणजे मंत्रिमंडळ आहेस का? असेही जरांगे म्हणाले. 

तुमच्यासारख्या मी जातीवादी नाही

वाद लावण्यासाठी मोर्चे काढण्यासाठी हा कुटाणे करतो, ओबीसींनी शहाणे व्हावे याच्या नादी लागून ओबीसींच वाटोळ करु नये. त्यांना जर आमचं चॅलेंज केलं तर 1994 चा जीआर आम्ही चॅलेंज करणार असल्याचे जरांगे म्हणाले. आतापर्यंत हजारो कोटी रुपये दिले तेव्हा सारथी तर आता दोन वर्षात आली असे जरांगे म्हणाले. आम्ही म्हटलं का ओबीसी महामंडळाला महाज्योती का दिले म्हणून असे जरांगे म्हणाले. तुमच्यासारख्या मी जातीवादी नाही. तुम्ही उपसमिती बोलावली त्यात एकही मराठा नाही सरळ सरळ जातीवादी आहे हे तुम्हाला दिसलं नाही का? असेही जरांगे म्हणाले. 

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले होते छगन भुजबळ?

कोणी म्हणत असले पुन्हा रस्त्यावर उतरू तर ओबीसी समाज देखील ग्रामीण पातळीवर मोर्चे काढत आहेत. ते एकत्र येऊ शकतील. या देशात लोकशाही आहे. अजून जरांगेशाही यायची आहे. इतर देशात सुरू आहे. पण, आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आहे. त्यामुळे इथे जरांगेशाही येणार नाही, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. 

महत्वाच्या बातम्या:

Chhagan Bhujbal on Maratha Reservation GR : मी फडणवीसांचा आदर करतो, पण... ; मराठा आरक्षणाच्या जीआरवर छगन भुजबळ तीव्र नाराज, काय म्हणाले?