सोलापूर: सोलापूरचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक आरिफ शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आरिफ शेख हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे सूडाचं राजकारण करत असून उमेदवारीचा शब्द देऊन ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानं हे पाऊल उचलल्याचं आरिफ शेख यांनी सांगितलं. 'मी सख्या भावाला सोडून तुमच्या मागे राहिलो, कायम मी काँग्रेसच्या पाठीशी होतो. तेव्हा तुम्हाला मी चुकीचा वाटलो नाही का?' असाही त्यांनी प्रणिती शिंदेंना सवाल केला.
माजी महापौर आरिफ शेख
आरिफ शेख हे कधीकाळी शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जायचे. आरिफ शेख यांचे बंधू तौफिक शेख यांनी एमआयएमच्या तिकिटावर प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्याचाच राग मनात ठेवत आपलं तिकीट कापल्याचा दावा शेख यांनी केला आहे.
संबंधित बातम्या:
आता डाव्यांमध्ये घराणेशाही, आडम मास्तरांकडून पत्नी, मुलीला उमेदवारी
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस