Navratri festival : उद्यापासून सुरु होणाऱ्या नवरात्र महोत्सवासाठी ( Navratri festival) सोलापूर (Solapur) जिल्ह्यात दिनांक 22 सप्टेंबर 2025 ते 7 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नवरात्र उत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डॉल्बी, डी.जे. सिस्टीम व लेझर लाईट शोच्या वापरास प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये हा आदेश जारी केला आहे. या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत होताना दिसत आहे. 

Continues below advertisement

सार्वजनिक आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने डॉल्बी, डि.जे. व लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध

मागील वर्षी सार्वजनिक शक्तीदेवी उत्सव मंडळ व गरबा- दांडिया आयोजक मंडळाकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये डॉल्बी व डि.जे. सिस्टीममुळे काही भाविकांना कान व छातीच्या त्रासामुळे अपंगत्व किंवा जीवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आली होती. तसेच लेझर लाईटमुळे वयोवृद्ध व लहान मुलांच्या डोळ्यांना इजा झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात ज्येष्ठ नागरिक संघटनांनी निवेदन सादर केले असून, उपविभागीय अधिकारी, सोलापूर क्र. 1 यांनी दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजीचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, सार्वजनिक आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने डॉल्बी, डि.जे. व लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे की, सार्वजनिक शक्तीदेवी उत्सव मंडळ व गरबा- दांडिया आयोजक मंडळाकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये व मिरवणुकांमध्ये वरील तंत्रज्ञानाचा वापर पूर्णतः प्रतिबंधित करण्यात येत आहे.  जिल्ह्यातील सर्व तालुके व सार्वजनिक कार्यक्रमांवर हा देश लागू करण्यात आला आहे.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

डीजे,डॉल्बी मिरवणूक ही अंत्ययात्रा, काहीही करून बंदी आणा, साताऱ्यात मागणी; कोल्हापुरात गणेशोत्सवात लेसर लाईटच्या वापरावर बंदी