सोलापूर : सोलापूर शासकिय रुग्णालयातील अनास्थेविरोधात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आक्रमक झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


शासकीय रुग्णालयांतील ढिसाळ कारभाराविरोधात काँग्रेसने प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं. शासकीय रुग्णालयातले उपचार गरिबांना परवडणारे नसल्याचं सांगत प्रणिती शिंदेंनी सरकारला धारेवर धरलं.

शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता, औषधांचा तुटवडा, महागलेले उपचार आणि रुग्णसेवेत होणाऱ्या हलगर्जीपणाविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले.

प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. शासकीय रुग्णालायातील अनास्थेविरोधात प्रणिती शिंदे रस्त्यावर उतरल्या होत्या.