यवतमाळ: कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा आव आणणाऱ्या एकाला पोलिसांनी चोरीच्या आरोपात अटक केली आहे. साहिल भोसले असे या कीर्तनकाराचे नाव असून त्याच्यावर मोबाईल आणि पाकीटमारीचा आरोप आहे.


साहिल भोसले यानं सव्वालाख रुपये किमतीचे 13 मोबाईल चोरल्याची कबुली पुसद पोलिसांना दिलीय.

19 वर्षाचा साहिल भोजले सवना येथील रहिवासी आहे. त्याचं दहावीपर्यंत शिक्षण झालंय. भागवत, गीता, रामायण, महाभारत आणि अनेक संतांची कीर्तन सांगतो.

मात्र, पुसद शहरालगतच्या श्रीरामपूर येथील एका घरातून पाकीट चोरण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक केलीय. त्यानतंर त्याचं बिंग फुटलं आहे.