मुंबई : भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी सोमवारी रात्री 14 किलोमीटर अनवाणी चालत जाऊन दादरच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत एकता कपूर देखील होत्या. एकता कपूर यांनी याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयात पोस्ट केला आहे.

याच बरोबर सिद्धिविनायक मंदिरातील दर्शनाचे फोटो ही टाकण्यात आले आहेत.तसेच दर्शन झाल्यावर देखील कार मधून जातानाच व्हिडीओ टाकण्यात आला आहे. यात आमचा नवस पूर्ण झाला असे त्या म्हणत आहेत. तसेच दुसऱ्या व्हिडीओत स्मृती इराणी या चालत अनवाणी आल्याचे आश्चर्य एकता कपूर व्यक्त केले आहे.






मला विश्वास बसत नाहीये की स्मृती इराणी यांनी अनवाणी पायांनी 14 किलोमीटर अंतर पायी चालत पूर्ण केले आहे, असे एकता कपूरने हा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर करत म्हटले आहे.

माझी मनोकामना पूर्ण झाली, त्यामुळे सिद्धिविनायक चरणी लीन झाले, अशी प्रतिक्रिया या व्हिडीओत स्मृती इराणी यांनी दिली आहे.

स्मृती इराणी यांनी काँग्रेसचा गड मानला जाणारा अमेठी मतदारसंघ आता भाजपने खेचून आणला आहे. गेल्यावेळी पराभवाचा सामना केलेल्या स्मृती इराणी यांनी यावेळी मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना धूळ चारत गड काबीज केला.

ज्या अमेठीला लोक गांधी परिवाराच्या नावाने ओळखायचे त्या अमेठीला आता 'अमेठीची दीदी' म्हणजेच स्मृती इराणी यांची नवी ओळख मिळाली आहे.

स्मृती इराणी यांचा हा विजय चित्रपटाच्या कथेला शोभेल असाच आहे. हा करिष्मा स्मृती इराणी यांनी केवळ पाच वर्षात करून दाखवला, ज्याची गेल्या 15 वर्षांपासून भाजप वाट पाहून होती.