Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 29 मे 2019 | बुधवार | ABP Majha 

1. संभाव्य मंत्रिमंडळाबद्दल मोदी-शाहांमध्ये तब्बल पाच तास चर्चा, 20 टक्के मंत्र्यांना बदलण्याची शक्यता, तरुणांना संधीची आशा

2. उद्या नव्या सरकारचा शपथविधी, पंतप्रधान मोदींच्या शपथविधीला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार

3. काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर राहुल गांधी अजूनही ठाम, अध्यक्षपदासाठी स्वच्छ प्रतिमेच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाचीही चर्चा

4. विधानसभा निवडणुकीत मनसेला सोबत घ्या, आघाडीच्या बैठकीत उमटला नवा सूर, तर मावळच्या पराभवाची जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारली

5. पायल तडवी प्रकरणात तिन्ही आरोपींना बेड्या, दोषींवर कारवाईचं महाजनांचं आश्वासन, उच्चस्तरीय चौकशी सुरु

6. 14 किमी अनवाणी पायपीट करत स्मृती इराणी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, राहुल गांधींना पराभूत केल्यानंतर बाप्पाच्या चरणी

7. निवडणूक लढवायला हिंमत लागते, आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढवण्यावर निलेश राणेंची टीका

8. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात नवी मुंबई पोलिस सहकार्य करत नाहीत, सरकारी वकिलांचा आरोप

9.  जेट एअरवेजची सेवा बंद झाल्याने औरंगाबादच्या उद्योग आणि पर्यटनावर संकट, तिकिटांची किंमत वाढली

10. विश्वचषकाआधी टीम इंडियाची दमदार प्रॅक्टिस, बांगलादेशवर मात, लोकेश राहुल-महेंद्रसिंग धोनीची खणखणीत शतकाने धावांचा डोंगर