1. मोदी सरकारकडून कोरोना नव्हे, ट्विटरवरील टीका, आक्षेपार्ह प्रतिक्रिया हटवण्यास प्राधान्य, लँसेटमधून ताशेरे 


2. देशात ऑक्सिजन आणि औषधांची व्यवस्था सुधारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 12 डॉक्टर्सच्या टास्क फोर्सची निर्मिती 


3. कोरोना सेंटरमध्ये भरती होण्यासाठी कोविड रिपोर्ट नको, कोणत्याही रुग्णाची अडवणूक करता येणार नाही, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेश 


4. कोरोनाविरोधातील लढाईत डीआरडीओचं दुहेरी अस्त्र, कोरोनावरील प्रभावी औषधासोबतच, सॉफ्टवेअरचीही निर्मिती


5. राज्यात लॉकडाऊन वाढणार की नाही, 15 तारखेला होणार निर्णय, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती 


6. मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र, महाराष्ट्रातील लसीकरणासाठी वेगळं अॅप बनवण्याची परवानगी द्या, मुख्यमंत्र्यांची मागणी 


7. देशातील 180 जिल्ह्यांत 7 दिवसांत एकही नवा कोरोना रुग्ण नाही, 54 जिल्ह्यांत 3 आठवड्यांत नवा कोरोनाग्रस्त नाही, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती 


8. नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार आहेर यांच्यात शाब्दिक बाचाबाची, जिल्हा रुग्णालयातील खाटा, ग्रामीण रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीनच्या मुद्द्यावरून वाद 


9. चंद्रपूरात डॉक्टरकडून रेमडेसिवीरचा काळाबाजार, चढ्या दरात औषधाची विक्री, पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या डॉक्टर, नर्सची चौकशी सुरु 


10. 7 वर्षांहून कमी शिक्षा आणि सौम्य गुन्हे असणाऱ्या कैद्यांची पॅरोलवर सुटका करा, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय