1. मराठा आरक्षणासह इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासह पंतप्रधानांच्या भेटीला
2. आज सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश, लोकपरंपरेनुसार पावसाळ्याला सुरुवात, मुंबई, नवी मुंबईसह राज्याच्या काही भागांत वरुणराजाची हजेरी
3. पुढचे चार दिवस मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
4 .पुण्यात सॅनिटायझर कंपनीला भीषण आग, 15 महिलांसह 18 कामगारांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत जाहीर
5. 21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस, पंतप्रधानांकडून लसीकरणाच्या अपयशाचं खापर राज्य शासनांच्या डोक्यावर
6. कोरोनाच्या बाबतीत सीरमच्या कोविशील्ड लसीमुळं जास्त प्रमाणात अँटीबॉडीज तयार होतात, संशोधनातून स्पष्ट
7. बारावी बोर्डाचे निकाल काही दिवसांत लागतील, त्यानंतर व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमासंदर्भातील प्रथमवर्ष प्रवेशाचे निर्णय तातडीने घेणार
8. गरीबांसाठी पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य वितरणाला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ, 80 कोटी नागरिकांना मिळणार लाभ
9. मुंबईतील जंगल विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा, आरेकडून वन विभागास मिळाला 812 एकर जागेचा ताबा
10. Apple च्या जागतिक परिषदेत मोठ्या घोषणांची बरसात, अनेक नवनवीन फिचर्सची खैरात, युजर्ससाठी पर्वणी