सिंधुदुर्ग : जिल्ह्यात 10 ते 15 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10 ते 15 जून दरम्यान अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने केले आहे. 


विजा चमकत असताना घ्यावयाची दक्षता :



  • संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत.

  • दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. 

  • नागरिकांनी घराबाहेर पडू नये.

  • घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

  • विजेच्या खांबांपासून लांब रहावे.  

  • उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.  

  • एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.  

  • धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.


अति मुसळधार पावसात घ्यावयाची दक्षता :



  • आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. 

  • घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.

  • अतिमुसळधार आणि अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी रहा आणि पायी अथवा वाहनाने प्रावास करु नका.

  • घरा बाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची आणि रस्तेवाहतुकीची आणि पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करुन घ्या. 

  • पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तुंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. 


अति मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी :
 
जिल्हा नियंत्र कक्ष : 02362-228847 किंवा टोल फ्री - 1077 ला संपर्क करावा


तालुका नियंत्रण कक्ष :



  • दोडामार्ग तालुक्यासाठी : 02363-256518, 

  • सावंतवाडी तालुक्यासाठी : 02363-272028, 

  • वेंगुर्ला तालुक्यासाठी : 02366-262053, 

  • कुडाळ तालुक्यासाठी : 02362-222525, 

  • मालवाण तालुक्यासाठी : 02365-252045,

  • कणकवली तालुक्यासाठी : 02367-232025, 

  • देवगड तालुक्यासाठी : 02364-262204, 

  • वैभवाडी तालुक्यासाठी : 02367-237239, या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.


हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imd.gov.in या संकेतस्थळावरुन घ्यावी. तसेच टीव्ही, रेडिओ इ. वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवा. 


प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभागांना निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


सर्व विभागांनी आपल्या अधिनस्थ यंत्रणेला अतिवृष्टीची पूर्वसूचना द्यावी आणि त्याप्रमाणे आवश्यक ते नियोजन करावे. शोध आणि बचावाची सामग्री सुस्थितीत असल्याची खात्री करावी. आपत्कालीन संपर्क क्रमांक सुरु राहतील याची दक्षता घ्यावी. तसेच अतिवृष्टीच्या कालावधीत कोणीही मुख्यालय सोडू नये. बांधकाम विभागाने रस्त्यावर पडलेली झाडे त्वरित बाजुला करुन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. ऑक्सिजनची वाहतूक करणारे मार्ग अखंडितपणे सुरु राहतील यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. बंदर विभागाने अतिवृष्टीच्या कालावधीतील भरती - ओहोटीच्या तारखा जिल्हा आणि तालुका प्रशासनास उपलब्ध करून द्याव्यात. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर या कालावधीत सीसीसी, डीसीएचसी आणि डीसीएचच्या ठिकाणी पावसाचे पाणी जावून रुग्णांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. सीसीसी, डीसीएचसी, डीसीएच या ठिकाणी अखंडित विद्युत पुरवठा सुरु राहील यासाठी नियोजन करावे. तसेच कोविड केंद्रांसाठी जनरेटर उपलब्ध करून ठावेवेत. महसूल आणि पोलीस विभाग यांनी आपल्या ताब्यातील बोटी सुस्थितीत असल्याची खात्री करावी. अतिवृष्टीच्या अनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना दिल्या आहेत.


Ghotawade Phata Pune Fire : पुण्याच्या आगीतील मृतकांच्या परिवाराला राज्य सरकारकडून पाच तर केंद्राकडून दोन लाख रुपयांची मदत


पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. आग लागली त्यावेळी कंपनी 37 कर्मचारी होते त्यापैकी 18 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. तर पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. जखमी व्यक्तींना 50,000 रुपये भरपाई देण्यात येणार आहे.


पवार म्हणाले, अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल.