Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 24 एप्रिल 2021 | शनिवार | ABP Majha


1. रेमडेसिवीरच्या उत्पादनासाठी 25 नव्या कंपन्यांना मान्यता, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती, दरमहा 90 लाख रेमडेसिवीर तयार होणार


2. कोरोनावर झायडस कॅडिलाचं औषध 91.15 टक्के प्रभावी, वापरासाठी डीजीसीआयकडून मंजुरी, कोरोना सात दिवसात बरा होत असल्याचा कंपनीचा दावा


3. राज्यात काल कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक, दिवसभरात 74 हजार 045 रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर 66 हजार 836 नवीन रुग्णांचे निदान


3. कोविड रुग्णांना बेड देण्यासाठी वैद्यकीय चाचणी होणार, लक्षणे असणाऱ्यांच्या घरी जाऊन चाचणी, मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय


4. जळगावात कोरोनापाठोपाठ सारी आजारानेही रुग्णांचा मृत्यू, कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या 25 ते 30 टक्के मृत्यू सारीने, प्रशासनासह जनतेची चिंता वाढली


6. विशाखापट्टणमहून आलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस आज नाशिकमध्ये येणार, दोन टँकर नगरला तर दोन टँकरमधून नाशिकला पुरवठा होणार 


7. अनावश्यक वाहतुकीसाठी मुंबई पोलिसांनी आणलेला कलर कोडचा निर्णय सात दिवसात रद्द, पोलिसांवरील ताण आणि नागरिकांमधील संभ्रमामुळे निर्णय


8. रुग्णासह तिघांना घेऊन जाणारी लिफ्ट कोसळली, डोंबिवलीच्या कोविड रुग्णालयातील घटना, दुर्घटनेत कोरोना रुग्णासह चौघे जखमी


9. ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयात उपचारासाठी दीड लाख घेणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, मनसेने वाचा फोडल्यानंतर महापौरांकडून गुन्हा नोंदवण्याचे आदेश


10. लोकांच्या उपस्थितीचं बंधन असतानाही जळगावात धूमधडाक्यात लग्न, महापालिकेकडून 50 हजारांच्या दंडाची कारवाई, वधू-वराच्या मातापित्यावर गुन्हा