1. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना दिलासा, तक्रारदार महिलेची मुंडेंविरोधातील तक्रार मागे, खोटे आरोप केल्यास महिलेवर कारवाईची मागणी


2. पुण्यातील सीरमच्या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना सीरम इन्स्टिट्यूटकडून प्रत्येकी 25 लाखांची मदत, मुख्यमंत्री आज सीरमला भेट देणार


3. भंडारा आग दुर्घटनेप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांसह दोघांचं निलंबन, तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई, राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांचं ऑडिट होणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा


4. पालकांचा सांभाळ न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 टक्के कपात, औरंगाबाद जिल्हा परिषदेचा निर्णय


5. दहावी, बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर, 23 एप्रिलपासून बारावी तर, 29 एप्रिलपासून दहावीच्या परीक्षा


6. नाशिकच्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी भालचंद्र नेमाडेंची निवड करा, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारेंची मागणी, महानोरांचा अध्यक्षपदासाठी स्पष्ट नकार


7. कर्नाटकातील शिवमोगामध्ये स्फोटकं नेणाऱ्या ट्रकमध्ये भीषण स्फोट, स्फोटात 8 मजुरांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती


8. ग्रामपंचायतीत पडला पण बॅनरमुळे सोशल मीडियावर जिंकला, लातूरमध्ये पराभूत उमेदवार विकास शिंदें कोनाळीकरची बॅनरबाजी, बारा मतं देणाऱ्या मतदारांचे आभार


9. सत्तेत येताच 24 तासात जो बायडन यांनी ट्रम्प यांचा निर्णय बदलला, अमेरिका पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सहभागी


10. अभिनेता वरुण धवन बोहल्यावर चढण्यास सज्ज, सोशल मीडियावर विवाहस्थळापासून, लग्नाच्या रुपरेषेची चर्चा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला