1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर, तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी


2. तोक्ते चक्रीवादळाचा ठाणे जिल्ह्यालाही फटका, 2128 नागरिकांच्या घरांचं नुकसान, अहवालातून समोर आली माहिती 


3. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचीही तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागांना भेट, फळबागांच्या नुकसानाचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी


4. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात समुद्रातील बार्जवर मृत पावलेल्यांच्या नातेवाईंची गर्दी, बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध अद्यापही सुरुच


5. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचा किल्ला असणाऱ्या दगडी चाळीचा पुनर्विकास होणार, म्हाडानं दिला हिरवा कंदिल


6. देवेंद्र फडणवीस यांनी ई पास काढला आहे का, माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांचा सवाल, राज्याच्या मुख्य सचिवांकडे केला अर्ज 


7. काळ्या बुरशीनंतर आता जास्त घातक असणाऱ्या पांढऱ्या बुरशीचे रुग्ण, बिहारच्या पाटणा येथे आढळले 4 रुग्ण


8. भारत बायोटेक वाढवणार लसींचं उत्पादन, गुजरातमधील अंकलेश्वरमध्ये करणार कोवॅक्सिन लसींचं उत्पादन 


9. कोरोना रुग्ण 10 मीटरच्या अंतरात संसर्ग पसरवू शकतो, केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी 


10. कसोटी मालिका एक आठवडा आधी सुरु करण्यासाठी बीसीसीआयचं इंग्लंडला साकडं, आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्यासाठी धडपड सुरुच