1. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारतोफा आज थंडावणार,मराठवाड्यातील सहा जागांसह राज्यातल्या दहा मतदारसंघांमध्ये मतदान


 

  1. निवडणूक आयोगाकडून महिन्याभरात महाराष्ट्रातून मोठं घबाड जप्त,आचारसंहिता लागू झाल्यानंतर 112 कोटी रुपयांचा काळा पैसा ताब्यात


 

  1. माझ्या पुतण्याने सगळ्या घराचा कारभार हातात घेतला तरी चिंता नाही,जालन्यात शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला, तर सोलापुरात पवार आणि राज ठाकरे यांचा एकाच हॉटेलमध्ये मुक्काम


 

  1. 'मी लाभार्थी'जाहिरातीतील तरुणाला मंचावर बोलवत राज ठाकरेंकडून सरकारची पोलखोल,जातीयवादाचं विष पेरण्यासाठी आरक्षणाचा घाट घातल्याचाही आरोप


 

  1. उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार रॅलीत मोदींच्या नावाच्या घोषणा,भाजप कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्याचा आरोप, मात्र पोलिसांकडून आरोपांचं खंडन




  1. आझम खान,योगी आदित्यनाथ, मायावती, मेनका गांधी यांना निवडणूक आयोगाचा दणका, बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक प्रचारावर काही तासांची बंदी


 

  1. सुप्रीम कोर्टानेही'चौकीदार चौर है' मान्य केल्याचा दावा करणारे राहुल गांधी अडचणीत, सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस, 22 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश


 

  1. बळीराजासाठी गूड न्यूज,सरासरीच्या 96 टक्के पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, निवडणुकीच्या तोंडावरील भाकीतामुळे नेत्यांचेही डोळे आभाळाकडे


 

  1. हार्दिक पंड्याची तुफानी खेळी,आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची बंगळुरुवर पाच विकेट्स राखून मात


 

  1. आगामी विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा,दिनेश कार्तिक, केएल राहुल, विजय शंकर यांना संधी, तर रिषभ पंत आणि रायुडूला वगळलं