पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्धा येथील प्रचारसभेत पवार कुटुंबात अंतर्गत कलह सुरु असल्याचं वक्तव्य केलं होत. त्यावर जालना जिल्ह्यातील परतूर येथील सभेत पवारांनी पुन्हा मोदींना टोला लगावला आहे. "मोदी मला भेटतील तेव्हा मी त्यांना सांगणार आहे की माझ्या पोरीचं लग्न झालं आहे, मला कसली चिंता नाही. माझ्या पुतण्यानं सगळ्या घराचा कारभार केला तरी चिंता मला नाही", असं पवार म्हणाले. तसेच माझ्या घराची उठाठेव तुम्हाला कशाला असंही विचारणार असल्याचं पवार म्हणाले.
"आमच्या घरात मुलगी आहे, बायको आहे, इतर नातेवाईक येत असतात. मात्र मोदींच्या घरात कोणीच नाही. त्यामुळे मोदींना घर चालवायचं माहीत नाही. असं असताना ते दुसऱ्याच्या घरात डोकावतात. त्यांना मी सांगणार आहे की हे वागणं बरं नव्हं मोदीजी", असा टोला पवारांनी लगावला आहे.