दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. नोकरभरतीच्या परीक्षांचे पेपर फोडणारी एकच टोळी, म्हाडा परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाडांची माहिती, सीबीआय चौकशीची फडणवीसांची मागणी



2. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांनी दिलेला अल्टिमेटम संपला, मेस्मातंर्गत कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता, कामावर परतणाऱ्यांचं निलंबन मागे घेणार


राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला शेवटचा अल्टिमेट आज संपतोय. आंदोलक कर्मचाऱ्यांनी सोमवारपर्यंत कामावर रुजू व्हावे असं आवाहन परब यांनी केलं होतं. एसटी कर्मचारी आज कामावर रुजू झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली जाईल. मात्र, कामावर रुजू न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा परब यांनी दिला होता. संपामुळे आतापर्यंत एसटीचे जवळपास साडेपाचशे कोटींचं नुकसान झालंय. महामंडळाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत साधारणपणे दहा हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. एसटीच्या एकूण 93 हजार कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 20 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. 


 


3. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाची सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष


ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारसह एकूण तीन हस्तक्षेप याचिकांवरील सुनावणी आज होणार आहे. ओबीसी आरक्षणाबाबत अन्य राज्यांचा नियम महाराष्ट्रालाही लागू करा, अन्यथा सर्वच निवडणुका पुढे ढकलून इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी मुदत द्या अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसंच केंद्र सरकारकडे उपलब्ध असलेला डेटा राज्याला उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही याचिकेत करण्यात आलीय. निवडणूक आयोगाने राज्यातील 105 नगरपंचायतीमधील ओबीसी प्रभागातील निवडणुकीला स्थगिती दिली आहे. येत्या २१ डिसेंबरला यासाठी मतदान होणार आहे. फेब्रुवारीमध्ये 23 महापालिका, 25 जिल्हा परिषदा, 299 पंचायत समित्या, 285 नगर परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.


 


4. शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात दिल्लीच्या मंडावली पोलीस स्थानकात गुन्हा, महिलांचा अपमान केल्याप्रकरणी भाजपच्या महिला मोर्चाच्या दीप्ती रावत यांनी तक्रार दाखल



5. मुंबईतल्या अंधेरीत बारवर पोलिसांचा छापा, मेकअप रुममधील आरशामागील छुप्या खोलीचा पर्दाफाश, 17 बारबालांना अटक




6. प्रेयसीनं बुरखा घातल्यानं जमावाची तरुणाला बेदम मारहाण, अकोला जिल्ह्यातील गायगावातला संतापजनक प्रकार, घटनेचा व्हीडिओ व्हायरल



7. खाद्यतेल लीटरमागे 3 ते 4  रुपयांनी स्वस्त होणार, आयात शुल्कात कपात केल्यानं किमतीत मोठा दिलासा


 


8. गोव्यात पेट्रोल आणि बिअरपेक्षा टोमॅटो महाग,1 किलो टोमॅटोसाठी शंभरची नोट मोडण्याची वेळ


 


9. काशी विश्वनाथ कॉरिडोरचं आज लोकार्पण, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कार्यक्रम, वाराणसी नगरी सज्ज


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडोरचं आज लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी वाराणसी नगरी सजली आहे. मोदींच्या स्वागतासाठी काशी विश्वनाथ मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय. काशी विश्वनाथ कॉरिडोर लोकार्पणचा हा सोहळा जवळपास तीन तास चालणार आहे. या सोहळ्या दरम्यान आतषबाजी, लेजर शो आणि दीपोत्सवही पाहायला मिळणार आहे. 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वननाथ कॉरिडोरचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. आज पंतप्रधान मोदी या कार्यक्रमानंतर 2500 मजुरांसोबत भोजन करणार असल्याची देखील माहिती आहे. 



10. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये वधू वराला ग्रँड एंट्री पडली महाग, हार्नेस केबल तुटल्यानं नवदांपत्य 12 फुटांवरून कोसळलं, व्हिडीओ व्हायरल