- प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्रात, अमित शाहांच्या चार तर योगी आदित्यनाथ यांच्या दोन प्रचारसभा, मुख्यमंत्री सहा तर उद्धव ठाकरे चार सभांना संबोधणार
- मुंबईतील सांताक्रूझ आणि गोरेगावमध्ये आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार, ईडी, आघाडीबाबत राज ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष, पावसामुळे पुण्यातील कालची सभा रद्द
- प्रचारासाठी अखेर राहुल गांधींना मुहूर्त मिळाला, 13 ऑक्टोबरला राहुल गांधींची मुंबईत सभा, तर सोनिया गांधींची राष्ट्रवादीसोबत संयुक्त रॅली, सूत्रांची माहिती
- वंचित आघाडी वंचितांना सत्तेपासून दूर ठेवणारी, रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांवर टीका
- कल्याणमध्ये शिवसेनेच्या 26 नगरसेवकांचे राजीनामे, शिवसेना बंडखोर उमेदवाराला जाहीर समर्थन
- मुंबईत मिलन सबवेजवळ रेल्वे ट्रॅकजवळील कचऱ्याला आग तर वडाळ्यात झोपडीला आग लागून सहा जण गंभीर जखमी, आगरीपाड्यातही इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अग्नितांडव
- मुंबई विमानतळावरील 'ड्युटी फ्री' दुकानांना यापुढे जीएसटी लागू नाही, मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा
- 'जिओ' वापरकर्त्यांनो...फुकट कॉल विसरा, आता अन्य नेटवर्कसाठी मिनिटाला सहा पैसे मोजावे लागणार
- बिग बॉस शो बंद करा, अन्यथा सेट जाळून टाकू, करणी सेनेची धमकी
- टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून दुसरा कसोटी सामना, पुण्यातल्या गहूंजे स्टेडियमवर होणाऱ्या मॅचवर पावसाचं सावट