स्मार्ट बुलेटिन | 1 मे 2019 | बुधवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 01 May 2019 10:13 AM (IST)
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली, महाराष्ट्र सरकारकडून आज विविध कार्यक्रमांचं आयोजन 2. आचारसंहिता भंगप्रकरणी नरेंद्र मोदींना निवडणूक आयोगाची क्लीन चिट, काँग्रेसने हिंदूंचा अपमान केल्याच्या वक्तव्याविरोधातील तक्रारीवर दिलासा 3. चौकीदार चोर है हे सुप्रीम कोर्टाने मान्य केल्याचं बोलल्याबद्दल राहुल गांधींचा पुन्हा माफीनामा, प्रतिज्ञापत्रातील विसंगतीवर कोर्टाचे ताशेरे, नागरिकत्त्वाच्या मुद्यावरून गृह मंत्रालयाचीही नोटीस 4. दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्रातील आचारसंहिता शिथिल करा, राज्यातल्या लोकसभा निवडणुका संपताच मुख्यमंत्र्यांचं निवडणूक आयुक्तांना पत्र 5. मुंबईतील रेल्वे लाईनलगत भाजीपाल्यासाठी दूषित पाणी वापरणाऱ्यांचे परवाने रद्द करा, हायकोर्टाचे रेल्वे प्रशासनाला आदेश 6. खासदार राहुल शेवाळेंची पत्नी कामिनी यांना एक वर्षाची शिक्षा, 2014 मधील लोकसभा निवडणुकीवेळी पोलिसाला मारहाण भोवली, तूर्तास जामिन मंजूर 7. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी उद्योगपती नेस वाडियांना जपानच्या कोर्टाकडून दोन वर्षांची शिक्षा, अटक टळली, मात्र पुन्हा कायदा मोडल्यास जेलवारी निश्चित 8. आसारामपुत्र नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा, भक्त महिलेवरच्या बलात्कारप्रकरणी सुरत सत्र न्यायालयाचा निर्णय 9. अमेरिकेतील सिनसिनाटीमध्ये चौघांची हत्या, एक भारतीय पर्यटक, तर तिघे भारतीय वंशाचे, सुषमा स्वराज यांची ट्विटरवरुन माहिती 10. दहशतवादी मौलाना मसूद अझहरप्रकरणी चीन नरमला, पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानच्या दौऱ्यानंतर चर्चेतून मार्ग काढण्याची चीनची भूमिका