1. राज ठाकरेंच्या सभांचा खर्च मागण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार काय, पु. ल. देशपांडेंच्या सभांचा दाखला देत शरद पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल

    2. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या इसमाला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण, अंबरनाथमधला प्रकार, उठाबशा काढतानाचा व्हीडिओ मनसेकडून व्हायरल

    3. सध्याच्या बेलगाम भाजप नेत्यांनी तोंडावर जरा लगाम घालावा, माझा कट्टा कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं परखड मत

    4. नक्षलवादी परके नाहीत, सरकारने चर्चेतून मार्ग काढावा, मी मध्यस्थीसाठी तयार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं मत

    5. मुंबईत यंदा पाणीकपात नाही, धरणांमध्ये फक्त 22 टक्के पाणीसाठा असूनही महापौरांचा दिलासा, जळगावात मात्र तापीचं पात्र कोरडं पडल्यानं तीव्र पाणीटंचाई






  1. आजपासून तीन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज, नागपूरचा पारा 44 अंशांवर, हवामान विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  2. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रोड शो दरम्यान तरुणाकडून चापट, आप कार्यकर्त्यांनी हल्लेखोराला चोपलं

  3. केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी दहशतवादी मसूद अजहरला आदरार्थी संबोधले, झारखंडच्या रामगढमधल्या रोड शो दरम्यान मसूदजी असा उल्लेख

  4. जम्मू काश्मिरमधील अनंतनागमध्ये भाजप नेत्याची हत्या, घरात घुसून दहशतवाद्यांकडून गोळीबार



  • आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सनरायझर्स हैदराबादवर चार विकेट्सनी विजय, केन विल्यमसनची अर्धशतकी झुंज अपयशी