- विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, शक्तिप्रदर्शन करत नागपुरातून मुख्यमंत्री तर बारामतीतून अजित पवार अर्ज भरणार
- उमेदवारीबाबत स्पष्टता नसल्यानं एकनाथ खडसे आक्रमक, आज सकाळी 11 वाजता भूमिका स्पष्ट करणार, कार्यकर्त्यांना जमण्याचं खडसेंचं आवाहन
- चार उमेदवारांची भाजपची तिसरी यादी जाहीर, खडसेंसह तावडे आणि बावनकुळेही वेटिंगवर, प्रकाश मेहता, बाळासाहेब सानप, राज पुरोहितांचंही नाव नाही
- मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आशिष देशमुख मैदानात, तर भंडाऱ्यातील साकोलीतून नाना पटोलेंना उमेदवारी
- विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, प्रचारात सहभागी होणार नाही, संजय निरुपम यांचं विधान, तर काँग्रेस सोडण्याचाही सूचक इशारा
- अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा शिवसेनेत प्रवेश, मध्यरात्री शिवबंधन बांधलं, कळवा-मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाडांविरोधात लढणार
- शिवसेनेच्या दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट, कार्यकर्त्यांचा मध्यरात्री मातोश्रीबाहेर गोंधळ
- सहकारमंत्री सुभाष देशमुखांसह प्रणिती शिंदेंचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटलं, प्रतिज्ञापत्रातून माहिती केली जाहीर
- सहकाऱ्यांनी टोमणे मारणे म्हणजे आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं असा अर्थ होत नाही, हायकोर्टाचा निर्वाळा
- पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी HDIL च्या दोन संचालकांना अटक, बँकेत 4 हजार 335 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड