गडचिरोली : गेल्या 48 तासांच्या आत गडचिरोलीच्या सी -60 जवानांनी मोठं ऑपरेशन पार पाडलं आहे. राजाराम खानाला परिसरात 6 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. राजाराम कोरेपल्ली जंगलात हे ऑपरेशन पार पडलं.
महत्त्वाचं म्हणजे, या ऑपरेशनमध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर नंदू याला ठार करण्यात जवानांना यश आले आहे.
काल 16 नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत काल 16 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. डीव्हीसीचे सदस्य असलेले साईनाथ आणि सिनू या दोघांनाही ठार मारण्यात आलं. राज्यातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जाते. भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगल परिसरातील पोलिस आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली.
43 वर्षांचा सिनू हा मूळ वारंगलचा असून त्याचं खरं नाव विजयेंद्र राऊते. सुरुवातीला तो आंध्र प्रदेशमध्ये कार्यरत होता. 2003 मध्ये गडचिरोलीत तो दाखल झाला.
अनेक जबाबदाऱ्या पार पाडत काही वर्षांपासून तो दक्षिण गडचिरोली डिव्हीजनचा सचिव झाला. सिनूची पत्नीही नक्षल चळवळीत असल्याची माहिती आहे. मात्र ती पैसे घेऊन पळाल्यामुळे चळवळीत त्यांच्याविरोधात असंतोष होता.
साईनाथ हा पेरीमिली दलम कमांडर, त्याला डिव्हीजनल कमिटी सदस्य बनवण्यात आलं होतं. साईनाथ अत्यंत सक्रिय होता. त्याचं वय 35 वर्षांच्या घरात होतं. सातत्याने गडचिरोलीत होत असलेल्या अनेक नक्षली कारवाया आणि हत्याकांडाचा तो सूत्रधार होता.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गडचिरोलीत 48 तासात दुसरं ऑपरेशन, 6 नक्षलवाद्यांचा खात्मा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Apr 2018 11:27 PM (IST)
नक्षलवाद्यांचा कमांडर नंदू याला ठार करण्यात जवानांना यश आले आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -