Mahayuti Government : महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधी आज पार पडणार आहे. त्यामुळे सकाळपासून संभाव्य मंत्र्यांना मंत्रिपदासाठी फोनाफोनी होत आहे. दरम्यान भाजपकडून मंत्रीपदासाठी 19 जणांना फोन करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 10 जणांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून 11 जणांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे. या यादीमध्ये अनेक मंत्र्यांचा पत्ता कट झाला आहे. तब्बल 19 चेहरे सरकारमध्ये असणार आहेत. त्यामुळे मोठी खांदेपालट महायुती सरकारमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, मंत्रीपदामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाने बाजी मारली असून पश्चिम महाराष्ट्रातील 10 मंत्री महायुती सरकारमध्ये असणार आहेत. विदर्भमधील तबल नऊ मंत्री असणार आहेत.
ठाणे, कोकण विभागामधून आठ मंत्री असतील, तर उत्तर महाराष्ट्रातून सात मंत्री असणार आहेत. त्यामुळे म्हणजे एक प्रकारे या मंत्रिमंडळावर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचे प्राबल्य असणार आहे. मराठवाड्यातून सहा आणि मुंबईतील फक्त दोन मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये तब्बल 16 जिल्ह्यातील पाटी कोरी आहे. विदर्भातील सात जिल्ह्यांना मंत्रीपद मिळालेले नाही, तर मराठवाडामधील चार जिल्ह्यांना मंत्रीपदापासून मुकावं लागलं आहे. दरम्यान, फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकूण 42 मंत्री आहेत. यामधील सर्व मंत्री हे 16 जिल्ह्यांमधून येतात. त्यामध्ये सातारा आणि पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चार चार मंत्री आहेत. कोकणमधील तिन्ही जिल्ह्यांना मंत्रीपद मिळालं आहे.
मराठवाड्यामधील धाराशिव, नांदेड, जालना, हिंगोली या जिल्ह्यांची पाठी मात्र कोरी राहिली आहे. विदर्भातून नऊ मंत्री असले तरी सात जिल्ह्यांमध्ये पाटी कोरीच राहिली आहे. अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांना मंत्री पद मिळालेलं नाही. भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला सुद्धा मंत्रीपद मिळालेले नाही.
कसं असेल मंत्रीमंडळ?
- फडणवीस मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्र,विदर्भाचे वर्चस्व
- पश्चिम महाराष्ट्राचे 10 तर विदर्भाचे 9 मंत्री असणार
- ठाणे-कोकणचे 8 तर उ.महाराष्ट्राचे सात मंत्री असणार
- मराठवाड्याचे 6 तर मुंबईतले फक्त दोन मंत्री असणार
- फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी
- विदर्भातल्या सात,मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मंत्रिपद नाही
- फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले 42 मंत्री 20 जिल्ह्यातले
- सातारा आणि पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 4-4 मंत्री
- कोकणातल्या तिन्ही जिल्ह्यांना मिळाले मंत्री
- मराठवाड्यातल्या धाराशिव,नांदेड,जालना,हिंगोलीची पाटी कोरी
- विदर्भातून 9 मंत्री पण सात जिल्ह्यांची पाटी कोरी
- अकोला,अमरावती,वाशिमची पाटी कोरी
- भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्याला मंत्रीपद नाही
इतर महत्वाच्या बातम्या