बँक घोटाळाप्रकरणी धनंजय मुडेंची मध्यरात्री एसआयटीकडून चौकशी
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2016 04:05 AM (IST)
बीड: बीड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळाप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची एसआयटीमार्फत चौकशी काल मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात चौकशी करण्यात आली . धनंजय मुंडे हे मध्यरात्री एसआयटीसमोर हजर झाले. ही चौकशी तब्बल दीड तास सुरु होती. धनंजय मुंडेसोबतच अमरसिंह पंडितांचीही चौकशी करण्यात आली आहे. बीड जिल्हा बँकेच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात विशेष पथकानं गोपनीय अहवाल सादर केला होता. त्यानंतर कोर्टानं सर्वांना पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्यास बजावलं आहे.