बीड : बीड जिल्ह्यातील पाटोदा गावात महेश मल्टिस्टेट बँकेत बसवलेल्या सायरनच्या सेन्सरमध्ये पाल गेल्याने अचानक हा सायरन वाजू लागला. त्यामुळे जवळपास तासभर सर्वांचीच भंबेरी उडाली.
बीडच्या पाटोदा शहरातील बस स्टँडसमोर महेश मल्टिस्टेट बँकेची शाखा आहे. आज दुपारी अचानक सुरक्षा अलार्म वाजल्याने परिसरात एकच गोंधळ उडला. सायरन वाजल्यावर नागरिकांनी बँकेकडे धाव घेतली.
आज रविवारी सुट्टी असल्याने ही बँक बंद होती. सायरनच्या आवाजानंतर माहिती मिळताच बँकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र हा सर्व प्रकार पाल सायरनमध्ये घुसल्यामुळे उघड झालं.
भरदुपारी बँकेचा सायरन वाजला, चोराऐवजी पाल सापडली!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 May 2018 06:54 PM (IST)
बीड जिल्ह्यातील पाटोदा गावात महेश मल्टिस्टेट बँकेत बसवलेल्या सायरनच्या सेन्सरमध्ये पाल गेल्याने अचानक हा सायरन वाजू लागला. त्यामुळे जवळपास तासभर सर्वांचीच भंबेरी उडाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -